पोस्ट्स

फेब्रुवारी, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माणूस म्हणून जगताना

माणूस म्हणून जगताना  हा एक हिशोब करुन तर बघा! किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?   हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!  कधी असेही जगून बघा.....   कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी   समोरच्याचा विचार करुन तर बघा!   तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी   न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!   कधी असेही जगून बघा.....   संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात   कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!   स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण   कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!   कधी असेही जगून बघा.....   वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते   कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!   काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?   आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!   कधी असेही जगून बघा.....   प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?   एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!   ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते   त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!   कधी असेही जगून बघा.....     अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय ...

ती म्हणाली मला.....

ती म्हणाली तू मला इतका कसा ओळखतोस, कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस. आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते, तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'याद' येते. नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून, तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन? हे असं होण शक्य तरी कसं आहे, नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे. अगं वेडे... मी म्हणालो, अगं वेडे मी म्हणालो, क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो. अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते, तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते. येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो, तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो. तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो, तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो. तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो, मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो...