पोस्ट्स

सप्टेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्न

आज प्रथमच तिला पहिल मन वेडावुनच गेल, एकाच नजरेत तिने मला पुरत घायाळ केल, गुलाबी गाल... हरीणिची ती चाल मादक अशी तिची अदा, काय सांगू मित्रांनो... मी झालोय तिच्यावर फ़िदा, एकटक पाहत बसलो विसरून सर्व भान, मिळताच नजरेला नजर तिने खाली घातली मान, तिच्याजवळ बोलायची इच्छा खुप झाली, कसलाही विचार न करता सरळ तिचीच वाट धरली, तीही थोडीशी पुढे आली कदाचित तिलाही काही बोलायच होत, काय सांगू मित्रांनो.... नेमक तेव्हाच आईने जागवल होत...

मनातले शब्द मनातच राहून गेले..

मनातले शब्द मनातच राहून गेले... तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे, पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... हिम्मत साठवली आणि केले तीला SMS, पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं, पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे, पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं, पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले, आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले..