एकदा काय झालं,
एकदा काय झालं , एक सरिता रागवली आपल्या boyfriend ला म्हणाली ' हे रे काय सागर ! मीच का म्हणून ? दर वेळी मीच का मीच का यायचं खाली डोंगरावरून ? आणायचं रानावनातलं सारं तुझ्या साठी दरी बघायची नाही कडा बघायचा नाही कशी सुसाट पळत येते मी विरहव्याकुळ , संगमोत्सुक कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन तुझ्यात हरवून , हरपून जाईन आणि तू वेडा तुझं लक्षच नसतं कधी सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावू न असतोस . उसळतोस तिच्यासाठी तुझ्यासाठी पाणी आणते मी पण तुला भरती येते तिच्यासाठी मी नाही जा ! बोलणारच नाही आता . येणारही नाही . काठावरच्या लो...