पोस्ट्स

मैत्रीण

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी मनातील वादळांना मनातच थोपवणारी भासते कधी आकाशातील चांदणीसारखी तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर तरीही अंतःरात रुतलेली खोलवर तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

फक्त तुझ्याचसाठी ...........

फक्त तुझ्याचसाठी .......... आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजत असता मला हळूच चाहूल लागून जाते एक सावली पडून जाते थंड वारा वाहवून जाते तेव्हापासून सारखी मी वाट पाहते त्या सावलीची ती चाहूल त्या थंड वाऱ्याच्या झोक्याची नजरेसमोर येणारया त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची तेव्हा पासून मन माझे मला सांगत असते वाट पाहायची त्याच्यासाठी वाट पाहयची त्या सावलीसाठी कधीतरी ती व्यक्ति समोर येते मनाला आनंदाचा अस्वाद देते त्याच्या फक्त गोड शब्दांमधून अनेक गोडवे जाणवतात तेव्हा माझे मन स्वत: ठरवते सर्व काही मिळवीन फक्त तुझ्यासाठी सर्वकाही सोसीन फक्त तुझ्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन फक्त तुझ्यासाठी आयुष्यातील सर्व दु:ख गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन अन ते डोळे मिटिन मला असेच वाटते .... आयुष्य जगावे हे तुझ्याचसाठी सर्व काही संपवावे फक्त तुझ्याचसाठी प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा फक्त तुझ्याच साठी हे ह्र्दय काढून द्यावे फक्त तुझ्याच साठी

प्रेम हे असचं करायचं असतं..........

प्रेम हे असचं करायचं असतं............ . कट्ट्या वर College च्या बसुनि, येणाया प्रत्येकीलाच खुणवायचं असतं, नकाराचीच अपेक्षा ठेऊन, होकारचं गणित साधायचं असतं, जमलं तर जमा म्हणायचं, नाहीतर वाट पहाणं बाकी ठेवायचं असतं, याच college तल्या उद्योगाला प्रेम म्हणायचं असतं, सगळ्याच मुली त्यातल्या असतात, पण आपणं असं म्हणायचं नसतं, त्यांनाही वयाचं कोड असतं नि मनात बी अगदी आपल्यासारखं असत, पणं समाजानं मुलींना साळसुद समजुन मुलांनाच चावट म्हणायचं असतं, जग हे असचं असतं त्याकडं थोडं दुर्लक्ष करायचं असतं, काळा असो की गोरा, college त प्रत्येकानं प्रेम करायचं असतं, दिसण्यानं ना सही कर्तुत्वानं तिला भुलवायचं असतं, शरदाच्या रातीचं आकाश कितीही काळं असलं तरी चांदण्यानी ते फुलवायचं असतं, काळजात यासाठी प्रेम अधिक अनुभवायचं असतं, मोठी माणसं सांगत असतात, लफडयात कोणत्या पडायचं नसतं, पण हे सांगताना त्यांना आपलं लफडं आठवत असतं, Collegeचा अल्बम उघडतात नि चुरगळलेली फुलं नजरेसं पडत, म्हणुनचं सांगतात "बाबा अनुभव हेच सत्य असतं", अपयशी प्रेमी नेहमीच सांगत असतात

ग्लोबलायजेशन

ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन म्हणजे नेमक असत काय? आमच्या गल्लीत त्यांची दुकाने गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय! आणि दुसरे सांगा काय! आमचा मळा, आमचा माळी त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली याहून दुसरे सांगा काय? आमचे मास्तर त्यांच्या शाळा त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर याहून दुसरे सांगा काय? त्यांच्या कंपन्या आमची माणसे बिनभांडवली व्याज आपले असा ऍडव्हांटेज दुसरे काय? होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी भेटवस्तू मेड इन चायना ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय? जग म्हणजे एक लहान गाव मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे आणखी काय!

अशी असते ती मैत्री...

अशी असते ती मैत्री... मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणतो आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री

कवीता

कवीता असते डोळ्यात लपलेल्या अश्रूंसारखी कवीता असते फुला त लपलेल्या सुगधासारखी कवीता असते वातावरणात पडलेल्या दवासारखी कवीता असते हृदयात धड धड नार्‍या ठोक्यांसारखी कवीता असते शब्दात दडलेल्या स्वरांसारखी कवीता असते ओठ वर य नार्‍या आशीर्वाद सारखी कवीता असते पाठीवर पडलेल्या थापेसारखी कवीता असते म धात विरघळलेल्या गोडीसारखी कवीता असते बागेत उमललेल्या काळीसारखी कवीता असते आकाश्यात उधळलेल्या इंद्रधनुष्या सारखी कवीता असते स्वाचन्दपणे बागडनार्‍या पाखरा सारखी कवीता असते मातीच्या मंद गंधासारखी कवीता असते घाव भरणार्‍या मलमासारखी कवीता असते दुसर्‍यांसाठी जळणर्‍या पणतीसारखी कवीता असते दुखात खंबीर सात देणार्‍या मित्रासरखी

काय जादू असते या मैत्रीत !

काय जादू असते या मैत्रीत ! मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास कधी कधी वाटतं समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी आपण भान विसरुन लहान मुलासारखं त्यात खेळत असावं शिंपलेच शिंपले... विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे... सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा लगद उघडावा अन् त्यात मोती सापडावा खर्राखुर्रा, तुझ्यासारखा खरं सांगू का ! मोतीसुद्धा लाभावा लागतो तुझ्या सारखा