पोस्ट्स

ऑगस्ट, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गांधीजी Vs सावरकर

गांधीजी - भारतवासीयांनो शत्रूवर प्रेम करा व त्याच्यावर विश्वास ठेवा. सावरकर - शत्रूवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही. गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा. सावरकर - स्वरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. मूर्ख हिंदूंनो, एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही. गांधीजी - मी पण एक हिंदू आहे व हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात. सावरकर - तुम्ही पोकळ हिंदू आहात. रामाच्या हातात धनुष्यबाण व कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही हाती शस्त्र घ्यावे लागते. गांधीजी - हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय. शत्रूशी लढायचे असेल तर त्याच्या तत्त्वांशी लढा. सावरकर - युद्धात तत्त्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात, तत्त्वांनी नव्हे. गांधीजी - हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रूचे मन जिंका. सावरकर - ज्याने आपल्याला मारून टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदूंनो, अफझलखानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही, त्याचे ह्यदय फोडावे लागते.

इतकी नाजुक

इतकी नाजुक इतकी अल्लद ............... इतकी नाजुक इतकी अल्लद ........ फ़ुलपाखराहुन अलवार ............ चालु बघत नकळत होते वारया वरती अलगद स्वार इतकी नाजुक ...... निजल्या देही गव्हाषातुनी चंद्र किरण ते पडता चार लख्खगोरटी रापुन झाली रात्रीत एका सावळ नार इतकी नाजुक जरा तिचे मी जोर देउनी लिहीता नाव दावत आली दुसरया दिवशी अंगाअंगावर हळवे घाव इतकी नाजुक ..... इतकी नाजुक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो ...... ती गेल्यावरही तो क्शणभर प्रतिबिंबाला धरु बघतो ... इतकी नाजुक कि जेव्हा ती पावसात जाऊ बघते ....... भिती वाटते कारण जळात साखर क्शणात विरघळते . इतकी नाजुक कि आता तर स्मरणाचे ही भय वाटे ...... नको रुताया फ़ुलास असल्या माझ्या जगण्यातील काटे ----- संदिप खरे