पोस्ट्स

2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकदा काय झालं,

एकदा   काय   झालं , एक   सरिता   रागवली आपल्या  boyfriend  ला   म्हणाली ' हे   रे   काय   सागर  ! मीच   का   म्हणून  ? दर   वेळी   मीच   का मीच   का   यायचं   खाली   डोंगरावरून  ?   आणायचं   रानावनातलं   सारं   तुझ्या साठी दरी   बघायची   नाही कडा   बघायचा   नाही कशी   सुसाट   पळत   येते   मी विरहव्याकुळ ,  संगमोत्सुक कधी   एकदा   तुला   गच्च   मिठी   मारीन तुझ्यात   हरवून  ,  हरपून   जाईन आणि   तू   वेडा तुझं   लक्षच   नसतं   कधी   सारखा   त्या   चंद्रिकेकडे   टक   लावू न   असतोस . उसळतोस   तिच्यासाठी तुझ्यासाठी   पाणी   आणते   मी पण   तुला   भरती   येते   तिच्यासाठी मी   नाही   जा  ! बोलणारच   नाही   आता . येणारही   नाही . काठावरच्या   लो...

Real INDIAN political Leader

इमेज

एवढे एक करशील ना ?

एवढे एक करशील ना ? शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ? अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ? माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ? ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ? आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ? चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ? हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ? कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ? मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ? जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ? तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी.......... तूच एक असशील ना ?

नाक्यावरच्या पिंटूच एकदा..........

नाक्यावरच्या पिंटूच एक दा, सोसायटीतल्या पिंकिवर प्रेम जडल, लव लेटर लिहून दे , मित्रांनी पिंटूला फूल उचकवल.  पिंटून लिहिल लव लेटर, रात्र रात्र जागुन जागुन , चंद्र चांदण्या डार्लिंग जानू , भरल त्याचात कोम्बुन कोम्बुन. गाडीवरती ट्रिपल सीट बसून, रात्रि पिंटू सोसायटीत आला , घाबरू नको पिंटू म्हणुन , मित्रांनी त्याला धीर दिला . दगडाला लपेटून लेटर , पिंकिंच्या खोलीकडे भिरकावल, खिड़की फुटायचा आवाज आला , लेटर तसच हातात राहील. कोण आहे रे तिकडे म्हणुन , पिंकिच्या आईने दार उघडले , पिंटूला तिथच सोडून देऊन , मित्र त्याचाच गाडीवरून पळाले. चोर चोर चोर ओरडत , पिंकिच्या आईने केला कल्ला , पळता पळता पायाला पिंटूच्या, गल्लीचा कुत्रा कचकन चावला . पिंकिचा होकार तर दुरच , पण १४ इंजेक्शन घ्यावे लागले, पिंटूचे हे प्रेम प्रकरण, चांगलेच त्याच्या अंगावर आले

एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना......

एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना तरसताना बघाचय त्या बरसणार्‍या क्षणांना असावी तू चिंब भिजलेली ओल्या केसातूनी थेंबे ओघळलेली ओला पदर थोडा सरावा बाजूवर, अन काजळी गालावर ओघळलेली व्हावे मीही थेंब एक कुणीसे तुझ्या डोईवर पडून पायापर्यंत घसरावे सुखावेल मीही तुझ्या ओलत्या स्पर्शाने निथळारे रूप तुझे मनात साठवावे असे पाऊसाने थैमान घालावे मनाचे सारे बंध क्षणी कोसळावे तूझ्या देहावरून ओघळण्यासाठी जणू मग थेंब थेंब तरसावे स्प्रर्श तुझे तन-मनी काहूरणारे शब्द तूझे मल्हार छेडणारे खूपव्यात कोसळणार्‍या जलधारा जसे मदनाचे तीर रूतणारे ओलते रुप घ्यावे बाहुत भरुनी भारावते मन की गरज स्पर्शाची बान्ध कसा घालु माझीया मनाला वासना नव्हे ती ओढ मिलनाची व्हावे फ़ूलांचेही अंतर तेव्हा आपूल्या मिलनात रक्तातून उसळावी प्रीत श्वास मिळावीत श्वासात दूर जवळ ते प्रश्न उगा पडावेत कशाला ? दोन शरीर एक जीव बाकी उरावेत कशाला ?

तु...........

तु............ तु निघुन गेलीस कळलेच नाही जाताना जगच बदलेल माझे कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........ रडू नकोस उगीच चांगले नाही ते जाताना माझे रडणे राहूनच गेले तुला सगळे समजावताना............ आभाळं भरले आहे अगदी जसे होते तु जाताना पण आता तेही बरसत नाही उगीचच कारण नसताना................... अजूनही जातो त्याच बागेत रातराणी फ़ुलताना पण मला फ़क्त दिसते सकाळी ती कोमेजताना.................. झालेच नाही आपले बोलणे सगळा एकान्त असताना आज सगळं सुचत जातय एकटा कविता करताना............... माहीत नाही पुन्हा कधी भेटु वेगळ्या रस्त्यावर चलताना अन जुळतील का आपल्या तारा वेगळ्या जगात राहताना.............. विषय शोधावे लागतील आता संभाषण चालु असताना सगळे तसेच राहील का गं पुन्हा एकत्र असताना..................... शुन्यच आहे आयुष्य माझे उणे तु असताना धरलास का हात सांग तु सोडुनच जायचे असताना............... सोन्यासारखा संसार करशील दिल्या घरी नांदताना सांग माझी आठवण येइल का तुला ती बागेतली रातराणी फ़ुलताना......

मैत्रीचे नाते.................

मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी, नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती.. पण आहेस तरी नक्की कोण तू माझा, अवचित या मोहक वळणावर भेटलेला.. गुंफलेस तू धागे विश्वासाचे, देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे.. केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज, तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज.. पण ठाऊक आहे हे दोघांना, आवडतो आपण एकमेकांना.. घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन, नाही दुखवत भावनांना.. पाठराखण करतो एकमेकांची, रोजच उत्सुकता संवादाची.. ना ओढ आहे ही,ना आकर्षण, ना दिलेय मन एकमेकांना आंदण.. पण,बोलायला लागले आहेत डोळे, मैत्रीच्या वाटेवर फुलताहेत प्रेमाची फुले.. काय आहे तुझ्या मनात, जरा बोल तरी शब्दांत.. खुप झालाय मजेशीर हा गुंता, व्ह्ययलाच हवा आता उलगडा.. होईल का या नात्याची उकल, एक मात्र जरुर कर.. मित्र 'रहाच' ,बनलास जरी प्रियकर, कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर..

प्रेमाची एक गम्मत असते.....!

प्रेमाची एक गम्मत असते.....! सुरूवात त्याची डोळ्यांनी होते  मग ते हृदयापर्यंत जाऊन पोहोचते आधी नाही-नाही नंतर हो हे उत्तर असते  प्रेमाची हि एक गम्मत असते.....  डोळ्यांनी जे म्हटलं ते ओठांवर यायला उशीर होतो दिलीच साथ ओठांनी तर आपण नेमके दुसरे बोलतो  मग त्रास हा त्याचा नेमका आपण करून घेतो  प्रेमात सर्वांचे हे असेच होते  कारण, प्रेमाची एक गम्मत असते.....  मन आधी धावते ते मिळवायला  मिळाले कि वेळ द्यावा लागतो ते सांभाळायला  मन हे मग आपले राहत नाही  लक्ष तर कुठेच लागत नाही नजरेसमोर मग ती नेहमीच असते  प्रेमाची हिच तर गम्मत असते..... भटकलेला एखादा इथेच स्थिर होऊन जातो  मिळता प्रेम तो इथला वीर होऊन जातो  वीर झाले तरी इथे नमते घ्यावे लागते  रुसलीच तर तिला प्रेमाने समजवावे लागते  कारण, प्रेमाची एक गम्मत असते..... नुस्तच ठरवून कधी प्रेम होत नाही  डोळे जरी खूप बोलत असले, तरी न बोलता कधी प्रेम मिळत नाही  मनातले प्रेम कधी मनात ठेवायचे नसते वेळ जाण्याआधी सर्व काही तिला सांगायचे असते कारण, प्रेमाची एक वेगळीच गम्मत ...

फ़ोन..........(Click To Zoom)

इमेज