नाक्यावरच्या पिंटूच एकदा..........

नाक्यावरच्या पिंटूच एकदा,
सोसायटीतल्या पिंकिवर प्रेम जडल,
लव लेटर लिहून दे ,
मित्रांनी पिंटूला फूल उचकवल. 


पिंटून लिहिल लव लेटर,
रात्र रात्र जागुन जागुन ,
चंद्र चांदण्या डार्लिंग जानू ,
भरल त्याचात कोम्बुन कोम्बुन.


गाडीवरती ट्रिपल सीट बसून,
रात्रि पिंटू सोसायटीत आला ,
घाबरू नको पिंटू म्हणुन ,
मित्रांनी त्याला धीर दिला .


दगडाला लपेटून लेटर ,
पिंकिंच्या खोलीकडे भिरकावल,
खिड़की फुटायचा आवाज आला ,
लेटर तसच हातात राहील.


कोण आहे रे तिकडे म्हणुन ,
पिंकिच्या आईने दार उघडले ,
पिंटूला तिथच सोडून देऊन ,
मित्र त्याचाच गाडीवरून पळाले.


चोर चोर चोर ओरडत ,
पिंकिच्या आईने केला कल्ला ,
पळता पळता पायाला पिंटूच्या,
गल्लीचा कुत्रा कचकन चावला .


पिंकिचा होकार तर दुरच ,
पण १४ इंजेक्शन घ्यावे लागले,
पिंटूचे हे प्रेम प्रकरण,
चांगलेच त्याच्या अंगावर आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!