मी आज..माझ्या बापाला रडताना पाहिलय.

मी आज..माझ्या बापाला रडताना पाहिलय.
शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.

स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,
स्वप्नांना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

आई,मला सायकल हवी,
आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसर्या दिवशी माझ्या हातात चावी असायची.
मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारण
त्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.

मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,
छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.
तो थरथरणार्या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.

त्याच्या निघणार्या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

तो जळत राहिला वात बनून,
माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,
त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.
पण, आज तो या जगात नाही.
मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

तरीही....
माझ्या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलय
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलय......

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट