पोस्ट्स

कुणीच आपल नसतं.....

कुणीच आपल नसतं मग आपण कुणासाठी असतो आपलं हे क्षणिक समाधान इथ प्रत्येक जण एकटा असतो शब्दांनाहि कोड पडावं अशीही काही माणस असतात किती आपलं भाग्य असत जेव्हा ती आपली असतात अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही, सगळ कळतय मला पण तुला सोडून दुरही जाववत नाही जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी देण्यात महत्व असत कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं

आपल्या जवळ जे नाही

आपल्या जवळ जे नाही त्याचीच मानवी मनाला ओढ असते सर्वच मनं सारखी घडत नसतात म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते... फुले शिकवतात......, गुलाब सांगतो, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं; रात रानी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखात ही फुलायचं असतं; सदाफुली सांगते, रुसुन रुसुन रहायचं नसतं, हसुन हसुन हसायचं असतं; बकुळी म्हणते, सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं; मोगरा म्हणतो, स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो; कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवुन फुलायचं असतं…

आधार - एक कविता

झाडांना आधार मुळांचा मुळाना आधार मातीचा जर मातीच नात तोडु लागली तर फ़ुलानि कुनासाठि फ़ुलायच ? छपराला आधार भिंतिंचा भिंतीला आधार घराचा घराला आधार मानसांचा मानसच जर तोंड फ़िरावु लागलि तर मुलानी कुनासाठि हसायच? मनाला आधार प्रेमाचा प्रेमाला आधार तुझ्या विश्वासाचा पन जर तो विश्वासच डळमळु लागला तर मनातल्या मायेने कुनसाठि पाझराव? लेखक : माहीत नाही फ्रॉम :- दे धक्का !!!

मोबाइल संदेश

ती म्हणजे..... पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम, जमिन झेलायला आतुर पावसाच प्रत्येक थेंब, माझ्या जिवनात तु पावसासारखं बरसावं, त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं, तु बरसण्यासाठी आनि मी तरसण्यासाठी, एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे..... तु फ़क्त हो म्हन। -------------------------------------------------- ############################ ------------------------------------------------- मैत्री गोडीगुलाबी अन् थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम अन् थोडासा रागवा... नको अंतर कधी अन् नको तो दुरावा , पावसालाही लाजवेल असा हवा मैत्रीमधे ओलावा... पोस्टेड फ्रॉम :- दे धक्का !!!

वाट पाहण्याचा खेळ!!!!

पाने उलटतांना रोज एक पिंपळपान छळते ग तुझी माज़ी भेट अशी पान पान जपते ग.... भेटशील अशीच तू पुन्हा अन रंगेल जुना खेळ ग सागरची लाट एक तव किनारा हळूच भिजवेल ग... हुंदाका दाटेल कंठी अन शब्द ओठीच अडख़ळेल ग पुन्हा तेच पिंपळपान पाना पानात हसेल ग वाट पाहण्याचा हा खेळ सारा खेळ जरा जपून ग.........

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन.. ...टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून. दुरुनच बघायचय तिला चाकां आडून विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून चालायचय सोबत मग सायकल हातात धरून.. ...विचारणारे तिला आता योग्य संधी बघून. शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून.. ...कुणाचा रे विचार करतोयस तू अजून? नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून मी मात्र तिच्या नजरेला चुकवून.. ...काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून? तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून हातातली छत्री झटकन उघडून माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून.. ...पहायचय रे मला एकदा प्रेम करून !

पाहिले जेव्हा मी तुला.................

पाहिले जेव्हा मी तुला मन माझे गेले हरवूनी धडधडून तेव्हा सांगे ते मला प्रीती जडली लपुनी छपुनी ओठ ही सांगती मला मन माझे गेले गुंतूनी हकीकत माझी कशी तुला सांगू आहे कोण मी ते कुठवर लपवू का लपवूनी ठेविसी तुझे गुपित प्रयत्न करूनी झाले सर्व मला माहित जागो जागी आणुनी शब्द जिव्हेवर सांगतील सर्वां अपुल्या प्रीतिचे गुणगान