पोस्ट्स

पाऊस

थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरासू नकोस तू बरासलस तर ती अडकून बसेल तू थांबावा म्हणून माझे पत्र ती हातात घट्ट पकडून बसेल काही क्षण तुझ्या थांबण्याची .. मग ती…ती वाट पाहील निघेल मग पावसात ती सावरत सावरत ती माझ्या कडे येईल ती आल्यावर मग शांतच राहील कदाचित ओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत म्हणेल “माफ कर.मला उशीर झाला मी निघालेच होते पण पाऊस आला” मी माझा जॅकेट तिला देईल, ती म्हणेल नको रे मी ठीक आहे. हळूच मी तिचा हात हातात घेईल, मी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे तू माझ जिवनात सुख होऊन बरसशील ? तिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी पण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित, घरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल. माझे जॅकेट मला परत करून. निशब्द होऊन निघून जाईल ती निशब्द मला करून तोडून जाईल ती “”तू थांबू नको रे पावसा तू बरसतच रहा ती नाही आली तरी चालेल मला तिच्या नकारा पेक्षा … ती तुझ्या मूळे नाही आली असे खोट खोट.. मनाला समजावन आवडेल मला….”" तू थांबू नको रे तू बरसतच रहा ..........

Tu......

काय चाललंय तरी काय हे कळायला मार्ग असावा लागतो .... आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला तुझा चेहरा दिसावा लागतो .... ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय? आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय? तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ... तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून .....

असाच आहे मी...

असाच आहे मी... चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा वाऱ्याबरोबर दुर फिरायला जाणारा हिरव्या सावलीत कोठेतरी रमलेला असाच आहे मी कवितेतल्या चारओळीत कोठेतरी हरवलेला मला मी सांगू कसा वाटतो थेंब थेंब जसा रोज साठतो शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो टाळीला जेव्हा टाळीही मी देतो खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो, कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो मला मी सांगू असा वाटतो ... कधी कुणी भावनांचा वसंतही देतो तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो कधी डोळ्यात नकार साचतोच फार तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो मला मी सांगू असा वाटतो ... रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो आणि सायंकाळी मात्र मी एकटाच उरतो.... अरे कारण तो एकांतही मला उपभोगायचा असतो...आणि काय... आणि खरच असाच आहे मी...

म्हणून तर बघा - I LOVE YOU ...

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं यातला फरक समजू लागतो नाही नाही म्हणता आपणही प्रेमात पडू लागतो कधी हसणं विसरून गेलो तर ते हसायला शिकवतात जीवन हे खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात.... आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची, प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी म्हणूनच ........ असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा " I LOVE YOU "
इमेज

कधीतरी वाटतं....

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं  माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,   कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं  होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं  हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं   कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं   काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं  आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं   कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं  दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं  फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं   कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं  सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं  थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं   कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं  माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं  एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल... इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास... प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या... माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड... भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका... मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण... ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा... सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!