पोस्ट्स

ऑक्टोबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कधीतरी वाटतं....

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं  माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,   कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं  होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं  हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं   कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं   काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं  आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं   कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं  दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं  फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं   कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं  सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं  थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं   कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं  माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं  एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल... इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास... प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या... माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड... भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका... मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण... ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा... सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!

दळभद्री विचार

मुंबईतला सागरी पूल तर दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला. रस्त्यावरच्या भिकार्‍यांना मात्र नवाच प्रश्न पडू लागला. नामकरणाच्या राजकारणाशिवाय राजकारण्यांना जगता येणार नाही ! भिकार्‍यांचे दु:ख हे की, त्या पुलाखाली बसून भिक मागता येणार नाही !!

बघ तिला सांगुन!

म्हणुनच म्हणतो एकदातरी.... रोज रोज देशील एसएमएस तू पाठवून आतुरतेने हसत तो काढेल ती वाचून मेमरी फूल झाली की टाकेल डिलीट करून म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवून एक दिवस येईल गुलकंदाची बरनी घेवून लग्न ठरते म्हणत ती जाईल ती निघून म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! किती दिवस थांबणार तू बोलाल्यावाचुन एक दिवस येशील एकट तिला गाठून रडताच निघेल ती पत्रिका हातात देऊन म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! जाशील लग्नाला शेवटच बघायला म्हणुन मारशील तू अक्षता नवरयाला फेकून बघशील तेव्हाही तिला चोरून चोरून म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन! कधी तरी दिसशील तिला रस्त्यावरून थांबवेल तेव्हा तुला ती एक हाक मारून विसराशिर तू स्वतालाच तीच बाळ पाहून तीच म्हणेल तेव्हा तुला "एकदातरी...बघायच होतस मला सांगुन!!...."

ती.....

ती चालली होती, एकटीच एकटिच्या वाटेने..... कुणाचीतरी सोबत मिळेल या वेडया आशेने...... तसा डोक्यावरचा सुर्य होताच तिच्या साथीला..... जणु तो साथ देत होता तिच्या संथ गतीला....... तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे......... चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे...... अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाउ लागला..... भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला..... तिच्या शांत चेहरयावर हसु उमटले...... गुढ प्रकृतीचे जणु फक्त तिलाच उमगले...... आतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली....... पावसाच्या नुसत्या कल्पनेने ती प्रफ़ुल्लीत होऊ लागली..... तिला वाटल पावसाच्या आगणित सरी तिच्यावर कोसळणार..... अन.. मतीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळानार...... पन....तो मात्र तिला नुसतीच आशा दाखऊन परतला..... ढगाआड लपलेला सुर्य गालतल्या गालत हसला...... डोळयातुन तिच्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले....... त्या थेंबाणी मुळे जनु सारे आसमंत उजळले.... ती शुन्य नजरेने तिच्या वाटेकडे पाहु लागली....... थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली.... अन...ति पुन्हा एकटिच चालु लागली

मिस कॉल

थांबव ग राणी तुझ मिस कॉल देण, मोबाइल च बिल झालय आता ग जीवघेण, मिस कॉल देण्याची तुला हौस ग न्यारी, बिल मात्र पडतय माझ्या ग पादरी.... अलार्मच्या आधी ही येतो तुझा मिस कॉल, माझ्याही आधी होते माझ्या मोबाइलची सकाळ, कॉल करायला राणी तुला कधी जमतच नाही, चुकून केलाच कधीतर ५ मिनिटापेक्षा जास्त बोलायच नाही, मी कॉल केल्यावरमात्र तुला तासनतास बोलावास वाटत, तुझ बोलन वाढलेल पाहून काळीज्ञ माझ फाटत(धडधडत) तुझ हे मिस कॉल देण आता रोजचच झालय, माझाही तुला कॉल करण मग साहजिकच झालय, पण .... मी ही आता ठरवलय तुला कॉल नाही करायच, आलाच तुझा मिस कॉल तर तुलाच परत मिस कॉल द्यायच, तुझा कॉल येई पर्यंत तुला मिस कॉल देत रहायच, आणि तू कॉल केल्यानंतर मुद्दामहुन जास्त वेळ बोलायच, तुलाही कलुदे आता कॉल करण्याच दु:ख, मलाही मिलु दे मग थोडस मिस कॉल देण्याच सुख

Nathuram godse & Veer savarkar

इमेज