मिस कॉल

थांबव ग राणी
तुझ मिस कॉल देण,
मोबाइल च बिल झालय
आता ग जीवघेण,

मिस कॉल देण्याची
तुला हौस ग न्यारी,
बिल मात्र पडतय
माझ्या ग पादरी....

अलार्मच्या आधी ही
येतो तुझा मिस कॉल,
माझ्याही आधी होते
माझ्या मोबाइलची सकाळ,

कॉल करायला राणी
तुला कधी जमतच नाही,
चुकून केलाच कधीतर
५ मिनिटापेक्षा जास्त बोलायच नाही,

मी कॉल केल्यावरमात्र
तुला तासनतास बोलावास वाटत,
तुझ बोलन वाढलेल पाहून
काळीज्ञ माझ फाटत(धडधडत)

तुझ हे मिस कॉल देण
आता रोजचच झालय,
माझाही तुला कॉल करण
मग साहजिकच झालय,

पण ....
मी ही आता ठरवलय
तुला कॉल नाही करायच,
आलाच तुझा मिस कॉल
तर तुलाच परत मिस कॉल द्यायच,

तुझा कॉल येई पर्यंत
तुला मिस कॉल देत रहायच,
आणि तू कॉल केल्यानंतर
मुद्दामहुन जास्त वेळ बोलायच,

तुलाही कलुदे आता
कॉल करण्याच दु:ख,
मलाही मिलु दे मग
थोडस मिस कॉल देण्याच सुख

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे