लाज वाटते राजे.....
लाज वाटते राजे..... या जगात जगावे लागते
लाज वाटते राजे..... या जगात जगावे लागते.
समाजाचे हाल या उघड्या डोळ्यांनी बघावे लागते,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावे लागते...
कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे सुभेदाराची
सूनाही इथे सुरक्षित नाही राजे. आया, बहिणी, लेकी, सुना पवित्र राहिली नाहीत नाती,
शासन करणार्या तलावारीन्चीच गंजुन गेली पाती
आपल्या अब्रुच लक्तर, अब्रू लापन्यासाठीच मागावा लागत ...
नी लाज वाटते राजे, या जगात जगावे लागते.
हिंदवी स्वराज्य स्थापन करून, तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्रप्रेमाची उर्जा पेटउन निघून गेलात राजे पण या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर,
स्वताची पोली भाजनार्या...आणि आमचीच मत घेउन,
शेवटी सत्तेवर माजनार्या गल्ली-बोलाताल्या पुधार्याला, "रयतेचा राजा" म्हनाव लागत,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावे लागते.
ज्यांच्याकड़े पैसा आहे, त्यांच जगण जालय मस्त, नी पोटासाठी राबनार्यांच इथ मरण जालय स्वस्त.
किड्यामुंग्यासारखी इथ, जगताहेत माणस, भरदिवसा आपल मरण बघताहेत माणस.
वेदना असह्य होतात, म्हणून इछा मरण मागाव लागत...
नी लाज वाटते राजे, या जगात जगावे लागते.
तुमच्या सारखा छत्रपती पुन्हा इथ ज़ाला नाही, पुन्हा कुठल्या जिजाऊपोटी शिवबा जन्माला आला नाही
घरातल्या जिजाऊ आता, करीयर वूमन होत आहेत संस्कार करण्याऐवजी पोराला, पालना घरात देता आहेत.
कुत्र आईकड़े नी पोरग दाईकड़े असलेल बघाव लागत...
नी लाज वाटते राजे, या जगात जगावे लागते
अन्याय, अत्याचार, अधर्मावर इथल्या मानसाच, जिवापाड प्रेम जडलय, आणि हिंदू पतपातशाहीवर राजे, दहशतवादाच सावट पडलयं. बोम्बस्फोटाच्या भीतीने, वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मात्रुभूमित राजे, मोकला श्वासही घेता येत नाही.
गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोशान्ना वर्षानुवर्षे न्यायालयात जगदाव लागत
नी लाज वाटते राजे, या जगात जगावे लागते
स्वराज्य आहे इथे राजे, पण सुराज्याचा पत्ता नाही, म्हणतात ना... कौरव सारे माजले आहेत आणि पांडवनाच सत्ता नाही.
विरोध करण्याची हिंमत जाउन, निष्क्रियता पक्की मुरली आहे, माझीही तलवार बोथट जाली आहे,
आता फ़क्त शब्दनाच धार उरली आहे. समाज परिवर्तानाच चक्र इथ, दुबल्या हातानंच फिरावाव लागत,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावे लागते
टिप्पण्या