पोस्ट्स

Mobile

माझ्या आठवणीने तुझ ह्र्दय. व्हयब्रेट होउ दे. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. दुर सखे माझ्या पासुन. गेलिस तरि चालेल. बरेच दिवस मला तु. भेटली नाहिस तरी चालेल. पण जाशील तिथे माझ्या आठवणीचं. network coverage राहु दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. सखे एकटीच नीजशील कधी कधी. मी नसलेली उजाड स्वप्ने बघशील कधी कधी. पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यातं. माझा miscall राहु दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. दुर दुर राहुन असं. थकुन जाशील सखे. वण वण करुन सारी करुन. विझुन जाशील सखे. अशा वेळी फॊटो माझा बघून. तुझी battery recharge होउ दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे. जमल नाही प्रेम आपलं. झिरो balance झाला तरी. मोकळ बोलता यायला हव. मोकळ बोलुन topup करुन. प्रेम mobile राहु दे !. तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाचा. ringaton वाजु दे.

रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ?

रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ? खरंच तुझी कधी आठवणच येत नाही मला ...... ऐकायचं असेल जर तुला कारण याचं , सांगतो आज मी तुला अगदी खरं खरं .... कोणाची आठवण येण्यासाठी , आधी त्या व्यक्तीला विसरावं लागतं पण तू तर माझ्या ह्रदयात, रोमारोमात पूर्णपणे भिनलेली आहेस .... मग सांग मला तुझी आठवण कशी येणार ? जर तू प्रत्येक क्षणी माझ्या विचारांमध्येच आहेस जर मी तुला विसरूच शकत नाही.... तर मला तुझी आठवण कशी येणार ? म्हणूनच तूही कधी म्हणू नकोस ... की मला तुझी आठवण येते कारण त्या क्षणी तू मला, थोडा वेळ का होईना पण विसरून जाशील ! म्हणूनच पुन्हा कधी म्हणू नकोस ... की मला तुझी आठवण येते !!!!!!!

नाते तुझे

नाते तुझे हळुवार जपायचे, आठवण आली की अलगद उमलायचे, नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे, दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे? मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे, या वेडयामनाला कोन समजावयाचे? सागं आठवण आली की काय करायचे? तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे. मनातले हे बोल सांग कधी कळायचे? सागं आठवण आली की काय करायचे? नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे, सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे, येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे? फोन मात्र मीच करायचं, H.....R... U मत्र तू बोलायचे, तु दिसला की डोळे भरुण पहायचे, ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे, सागं आठवण आली की काय करायचे?.......

मैत्रीण

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी मनातील वादळांना मनातच थोपवणारी भासते कधी आकाशातील चांदणीसारखी तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर तरीही अंतःरात रुतलेली खोलवर तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

फक्त तुझ्याचसाठी ...........

फक्त तुझ्याचसाठी .......... आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजत असता मला हळूच चाहूल लागून जाते एक सावली पडून जाते थंड वारा वाहवून जाते तेव्हापासून सारखी मी वाट पाहते त्या सावलीची ती चाहूल त्या थंड वाऱ्याच्या झोक्याची नजरेसमोर येणारया त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची तेव्हा पासून मन माझे मला सांगत असते वाट पाहायची त्याच्यासाठी वाट पाहयची त्या सावलीसाठी कधीतरी ती व्यक्ति समोर येते मनाला आनंदाचा अस्वाद देते त्याच्या फक्त गोड शब्दांमधून अनेक गोडवे जाणवतात तेव्हा माझे मन स्वत: ठरवते सर्व काही मिळवीन फक्त तुझ्यासाठी सर्वकाही सोसीन फक्त तुझ्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन फक्त तुझ्यासाठी आयुष्यातील सर्व दु:ख गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन अन ते डोळे मिटिन मला असेच वाटते .... आयुष्य जगावे हे तुझ्याचसाठी सर्व काही संपवावे फक्त तुझ्याचसाठी प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा फक्त तुझ्याच साठी हे ह्र्दय काढून द्यावे फक्त तुझ्याच साठी

प्रेम हे असचं करायचं असतं..........

प्रेम हे असचं करायचं असतं............ . कट्ट्या वर College च्या बसुनि, येणाया प्रत्येकीलाच खुणवायचं असतं, नकाराचीच अपेक्षा ठेऊन, होकारचं गणित साधायचं असतं, जमलं तर जमा म्हणायचं, नाहीतर वाट पहाणं बाकी ठेवायचं असतं, याच college तल्या उद्योगाला प्रेम म्हणायचं असतं, सगळ्याच मुली त्यातल्या असतात, पण आपणं असं म्हणायचं नसतं, त्यांनाही वयाचं कोड असतं नि मनात बी अगदी आपल्यासारखं असत, पणं समाजानं मुलींना साळसुद समजुन मुलांनाच चावट म्हणायचं असतं, जग हे असचं असतं त्याकडं थोडं दुर्लक्ष करायचं असतं, काळा असो की गोरा, college त प्रत्येकानं प्रेम करायचं असतं, दिसण्यानं ना सही कर्तुत्वानं तिला भुलवायचं असतं, शरदाच्या रातीचं आकाश कितीही काळं असलं तरी चांदण्यानी ते फुलवायचं असतं, काळजात यासाठी प्रेम अधिक अनुभवायचं असतं, मोठी माणसं सांगत असतात, लफडयात कोणत्या पडायचं नसतं, पण हे सांगताना त्यांना आपलं लफडं आठवत असतं, Collegeचा अल्बम उघडतात नि चुरगळलेली फुलं नजरेसं पडत, म्हणुनचं सांगतात "बाबा अनुभव हेच सत्य असतं", अपयशी प्रेमी नेहमीच सांगत असतात

ग्लोबलायजेशन

ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन म्हणजे नेमक असत काय? आमच्या गल्लीत त्यांची दुकाने गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय! आणि दुसरे सांगा काय! आमचा मळा, आमचा माळी त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली याहून दुसरे सांगा काय? आमचे मास्तर त्यांच्या शाळा त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर याहून दुसरे सांगा काय? त्यांच्या कंपन्या आमची माणसे बिनभांडवली व्याज आपले असा ऍडव्हांटेज दुसरे काय? होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी भेटवस्तू मेड इन चायना ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय? जग म्हणजे एक लहान गाव मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे आणखी काय!