पोस्ट्स

दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा

चकली खाईन कडाम कुडुम......!! तडम तुडुम तडम तुडुम चकली खाईन कडाम कुडुम......!! दोनच दात.......पण खायची घाई नीट घास रे......अशी ओरडते आई......!! बेसन लाडू किती छान रव्याचा लाडू गोरा गोरा पान.......!!  करंजी शेव ची जमली गट्टी  विसरा गृहपाठ.......शालेला पडली सुट्टी.....!! चिवडा शंकरपाली मस्त मजा अनारसा म्हणजे दिवालीचा राजा.......!! भुईचक्र अनार फुलबाजा.......मजा येईल छान उटण्याची आंघोळ करून ज़रा होइन गोरा पान........!! बाबांनी आणला आकाश कंदील हात उनचाउन तो दादा दारावर बांधेल.......!! भाऊबिज ला ताई देईल.......गोड़ गोड़ मुका  म्हणेल चला नमस्कार करा........पायावर डोक टेका.......!! छान छान आहे माझी दीवाली....... द्या मला एक चकली.......खाताना जर माझी आठवण आली........!! हाक मारा फ़क्त मला मी धावत येईन........ दोनच दात असले तरी काय झाल....कडाम कुडुम...कडाम कुडुम....चकली खाईन.......!! कडाम कुडुम...कडाम कुडुम....चकली खाईन.......!!  _./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.¸.•¤**¤•., . *•. .•* दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा /.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•..,.•¤**¤•.,

मी...मी कोण आहे

मी...मी कोण आहे आणि कसा आहे आणि का आहे??हे प्रश्न मोठ-मोठ्या लोकांना निरुत्त्तर करतात..ह्या प्रश्नाना मी काय उत्तर देणार??आफ़ाट पसरलेल्या या भूसागरात,ब्रह्मांडात मी एक शुल्लक ठिपका आहे..एक उर्जाकण,ह्याहून जास्त काही नाही.मी ईथे का आहे..का जगतोय??हे सगळ आधिच ठरलेल आहे..ते जाणण्याची माझ्या बुद्धिची पोच नाही..कधी तरी ते माला कळेल..शेवटी तेच तर शोधण्यासाठी माझा जन्म झाला आहे..मी एकटाच जन्माला आलो.... अणि एकटच पंच महाभुतात विलीन होणार...... ही सगळी नाती, परिवार, सगळ डोळ्यासमोर पसरवण्यात आलेले एक चित्र आहे...... वास्तव नाही.... तुम्ही जगता, सकाळी उठता, श्वास घेता, आजारी पडता हा तुमचा भास आहे..... डोक्यातल्या ज्या अवयवाला आपण मेंदू म्हणतो..... त्यची किमया अपरंपार आहे, त्यात एव्हढी शक्ति दडलेली आहे त्याची कोणालाच कल्पना नाही..... physics मध्ये जे universal constants आहेत ते सत्यात शाश्वत नाही. एक अद्न्यात उर्जा त्यांना बद्धित ठेवते.हीच ती...... mind power...... ती कोणालही नेस्तनाभूत करु शकते नाही तर जीवन दान देवू शकते...... आपण सामान्य लोक ईश्वर म्हणतो..... तो तुमच्यातच लपलेला आहे..... त्याला ...

love is blind

http://in.youtube.com/watch?v=0fjP9o194Uo

आठवण आली तुझी की,

आठवण आली तुझी की, नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की, माझं मन कासाविस होतं मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की, वाटतं एकदाच तुला पाहावं अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य… कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरिही……… आठवण आली तुझी की, देवालाच मागतो मी…. नाही जमलं जे या जन्मी मिळू देत ते पुढच्या जन्मी

स्वर्गाची फालनी.........

इमेज

जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....

जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं.... माझं दुःख समजून प्रेमाने जवळ घेणारं ... तेव्हा माझ्या कविता माझ्याशी बोलू लागतात, त्याच माझ्याबरोबर हसतात, त्याच माझ्याबरोबर रडतात... धीर देऊन सांगतात.. तू नाहीस एकटी, घेऊन येतात बरोबर खूप साऱ्या आठवणी. आठवणींच्या जगात फिरताना दुःख मनातले विरून जाते, मात्र तिथून परत येताना अंतःकरण जड होते. वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं... मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागतं !!

रेशमी शब्दांस माझ्या वेदनेचे पीक झाले ....

रेशमी शब्दांस माझ्या वेदनेचे पीक झाले ....   बोलणारे बोलले की सर्व काही ठीक झाले !!   कोणती केली निराशा जीवना आता तुझी मी ?  दाबलेले हुंदकेही आज प्रासंगीक झाले !!   जाळल्या बागा मनाच्या तू जरी लाखो हजारो ..   एवढे मी सोसले की मम् ह्रिदय सोशीक झाले !!   अक्षरे वाचून माझी तू लिहाव्या दोन ओळी ...   "चांगले लिहितोस तू!" हे सांगणे मौखीक झाले !