नाक्यावरच्या पिंटूच एक दा, सोसायटीतल्या पिंकिवर प्रेम जडल, लव लेटर लिहून दे , मित्रांनी पिंटूला फूल उचकवल. पिंटून लिहिल लव लेटर, रात्र रात्र जागुन जागुन , चंद्र चांदण्या डार्लिंग जानू , भरल त्याचात कोम्बुन कोम्बुन. गाडीवरती ट्रिपल सीट बसून, रात्रि पिंटू सोसायटीत आला , घाबरू नको पिंटू म्हणुन , मित्रांनी त्याला धीर दिला . दगडाला लपेटून लेटर , पिंकिंच्या खोलीकडे भिरकावल, खिड़की फुटायचा आवाज आला , लेटर तसच हातात राहील. कोण आहे रे तिकडे म्हणुन , पिंकिच्या आईने दार उघडले , पिंटूला तिथच सोडून देऊन , मित्र त्याचाच गाडीवरून पळाले. चोर चोर चोर ओरडत , पिंकिच्या आईने केला कल्ला , पळता पळता पायाला पिंटूच्या, गल्लीचा कुत्रा कचकन चावला . पिंकिचा होकार तर दुरच , पण १४ इंजेक्शन घ्यावे लागले, पिंटूचे हे प्रेम प्रकरण, चांगलेच त्याच्या अंगावर आले