पोस्ट्स

ऑगस्ट, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणपति बाप्पा

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ? मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो काय करू आता सार मॅनेज होत नाही पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ? डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ? असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको परत येउन मला दमलो म्हणायला नको माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस सी ई ओ ची पोझ...

मी तुझ्याबरोबर

मी तुझ्याबरोबर खेळतो तेच मुळी हरण्यासाठी तुझ्या गालावरल्या खळीत हसु भरण्यासाठी! प्रेम होतं किंवा केलं जातं यावर पुर्वी पासुन वाद आहे पण एक मात्र नक्की, जो प्रेमात पडला... तो वैयक्तिक जीवनात बाद आहे! प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे, कारण गुणांपर्यत ठीक आहे, दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे! तु कौलेजला आलीस की माझी नजर तुझ्यावर खिळते त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची स्फुर्ती मला मिळते! तु इतकी सुंदर आहेस की कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल! प्रेमे मिळणं ही सुध्दा एक कला आहे, पण मी प्रेम मिळवु शकलो नाही याचं दु:ख मला आहे! शाळेत मुलीच्या बाजुला बसणं ही आमच्यावेळी शिक्षा होती आज कुणीतरी बाजुला बसावं ही माझी छोटीसी अपेक्षा होती! चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर नेहली फक्त तु असतेस, तेंव्हा तर डोळे उघडे असतात, पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस! कौलेजच्या कट्ट्यावर मुलींना छेडणं हा जणु काही आमचा खेळ होता परीक्षेच्या दिवसातही ह्या गोष्टींसाठी प्रेत्येकाकडे बराच वेळ होता! प्रेमभंग म्हणजे मुका मार आहे, जखमा दिसत नसल्यातरी वेदना फार आहे!

नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!

नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!! काही अगदी जवळची, तर काही अशीच वरवरची... नाती काही क्षणातच जुळणारी, तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी... काही नात्यांना देता येत नाही नाव, तरीही ती असतात खूपच खास ! काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी, दूर राहूनही कधीच न तुटणारी... मात्र काही नाती तुटल्यानंतरही, जन्मभर आठवत राहणारी...

मैत्री हा असा एक धागा,

मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणतो आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर.........................................................

तिच्या प्रेमात पडतांना......

तिच्या प्रेमात पडतांना तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं तोंड दुखेपर्यंत बडबडलो पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं. तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं तिच्या नजरेला नजर भिडवतांना तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं. तिच्या हाताचा, ओठणीचा, स्पर्श हवाहवासा वाटतो सांगेन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहूनच गेलं. हसत राहीलो, हसवत राहिलो तिला दरवेळी, दर भेटीला. तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं. ती आली की वेळही उडून जायचा मला न समजता. पण, त्या दिवशी ती आली आणि निघाली त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...

आगस्टच्या पहील्या रविवारी ..

आगस्टच्या पहील्या रविवारी .. नेहमीच मैत्रीचा पूर येतो.. जिव्हाळ्याच्या या नात्याला आनंदाच्या ओघात वाहून नेतो.. प्रेमाच्या मैत्रीच्या सरी.. विश्वासाच्या नभातून कोसळत असतात.. नवचैतन्याच्या शिरशिरीत दोस्तीच्या गळामिठी घडत असतात.. कुठे शाळेच्या आठवणी तर कुठे कोलेजचे कट्टे डोळ्यासमोर येतात.. मस्करी,चेष्टा अन खोड्या आठवत.. नियमाच्यापलीकडचे नाते हळूवार जपत असतात... असले कसले हे नाते मैत्रीचे जिथं सारं काही विसरून ऐकमेकांसाठीच जगायला अन मरायल होतं.. एवलूसं हे रोपट मग पारंब्याच वड कस काय होतं? अश्याच पारंब्या आणखी वाढत राहो.. अज्रामर अश्या या मैत्रिच्या नात्याच वटवृक्ष.. माणूकीच्या अधार नात्याला..

आयुष्याच्या अल्बममध्ये......

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फ़ोटो असतात आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे. आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या, आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे. भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे, वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे. गीतेच रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या, रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे. कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे. सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे 'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे. द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल? एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या, एवढ्या सुन्दर जगण्यासाठी Thanks नुसत म्हणा ......

मराठी चारोळ्या

तुझा हात सोडतांना.. तुझा हात सोडतांना आभाळ भरलं होतं गेला देहातून प्राण प्रेत माझं उरलं होतं भावनाना कागदावर उमटवणे भावनाना कागदावर उमटवणे तितकेसे सोपे नसते अश्रुना लापवन्या इतके ते सुद्धा कठिन असते ........ मनातले त्याला कळले असते मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते .............. प्रेमाची शाल आंगवर घेऊन प्रेमाची शाल आंगवर घेऊन शरीर माज़े सवस्थ ज़ोपते पण शाली ची उब आसूनही ह्रदय माज़े का धढधढ तय.......... माझी कहाणी एकूण माझी कहाणी एकूण आज तो ही रडला लोक मात्र मणाली अरे आज पाउस कसा पडला............... तुझ्या केसतील फूल तुझ्या केसतील फूल सारखा मुसू मुसू रडत होते, कारण काही झाले तरीही ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत नवते...........

नको काढू माझी आठवण...............

नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , तू माझ्यावर केलेल्या प्रेमाला मी नाही विसरु शकत , तुझ्या माझ्याकडे वळनार्या पावलाना मी नाही रोखू शकत , नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , तू दिल तेवढ प्रेम कोणीही नाही देऊ शकत , तू घेतली तेवढी काळजी कोणीही नाही घेऊ शकत , नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , तुझ बोलन , हसन अन रागावन मी नाही विसरु शकत , तुझी माझ्यासाठी असलेली तलमल मी नाही बघू शकत , नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , तुला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत , मी ही केल तुझ्यावर प्रेम हे तुला नाही सांगू शकत , नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , मी नाही येऊ शकत...

शोधू कूठे तुला मी........

शोधू कूठे तुला मी नेहमीसारखेच काही हे दिवस जातात जणू तेच ते नेहमीचे जगणे तेच ते एकटे श्वास कधी-कधी मला वाटते जर हे जगणे नेहमीसारखे नसते तर.. तिथे जर तुझी साथ असती तर... कधी मी एकटा नसतो तर... तुझ्या विचारात हरवलेलो असतो मी भर गर्दित सुद्धा एकलकोंडा झालेला असतो मी ह्या हरवलेल्या वाटेत सावल्यांच्या खेळात फसलो मी बोल ना ग सखे शोधू कुठे तूला मी बागेपाशी उभा असतो फुलपाखरांना पाहत असतो ती फुलपाखरे एकटी नसतात त्यांच्या बरोबर निसर्ग असतो माझ्या नशीबात तू असतीस तर..... बागेमध्ये तू असतीस मी असतो अन निसर्गाच्या छायेखाली आपण असतो हळूच हसतेस काळजात ठसतेस तुझ्या आठवणीत विस्कळून गेलो मी तुझ्या आठवणींतच का जणू जगून मेलो मी वेडे आता ह्या जीवाला लागली तुझीच तमा.... सांग मला शोधू कुठे तूला मी माझे तुझ्यावर प्रेम आहे हे बोलायचे होते अन प्रेमाचे ते बोल बोलायचे राहूनच गेले काळ वेळ अन तिला मी आज हरलो एकटेपणाच्या भोवय्रात मीच कसा आज फसलो सावल्यांमध्ये का शोधत असतो तूला मी जरा मागे वळून पाहा माझ्याकडे बघ कसा मिठीत घेतो तुला मी मनच काय ह्र्दय सुद्धा आज बोलत आहे शोधू कुठे तूला मी ....

उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...

उशीर झाला हे तुला कळण्यासाठी... का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी... भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला दिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी... वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचे नसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी... उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...

तुला लाजण्याच कारणच काय???????

तुला लाजण्याच कारणच काय ? स्वप्नात अजुन मी आलोच कुठे ? तुला भ्यायचं कारणच काय ? अजुन तुही अगदी दूर माझ्या ? तुला शंकेच कारणाच काय ? अजुन नजरेला नजर भिडलीच कुठे ? तुझ्या गालांवर गुलाबाच कारणच काय ? अजुन हनुवटी तुझी, मी उचललीच कुठे ? डोळे बंद करण्याचे कारणच काय ? अजुन हातात हात तुझा घेतलाच कुठे ? तुला नजर झुकवण्याच कारणच काय ? अजुन ओठांना ओठ भिडलेच कुठे ? तुला लाजण्याच कारणच काय ?

एक अर्ध्यसत्य.......

कळत होते जवळ येताना की हे सुख क्षणिक आहे वळत नाही अजूनही की हे दु:ख क्षणिक नाही तू म्हनालीस मी तुला कधी विसरणार नाही मी म्हणालो मीही कधी तुला विसरणार नाही अर्ध्यसत्य ठरले ते कारण मी तुला विसरलोच नाही...

फक्त तुझ्याचसाठी.......

फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे....... कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......

साजं टळून गेल्यावर.........

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर. होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर. झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर. आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर

कधीतरी वाटतं......

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं, कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

एक आनोखी प्रेमकथा

एक चिडिया को एक सफ़ेद गुलाब से प्यार हो गया , उसने गुलाब को प्रपोस किया , गुलाब ने जवाब दिया की जिस दिन मै लाल हो जाऊंगा उस दिन मै तुमसे प्यार करूँगा , जवाब सुनके चिडिया गुलाब के आस पास काँटों में लोटने लगी और उसके खून से गुलाब लाल हो गया, ये देखके गुलाब ने भी उससे कहा की वो उससे प्यार करता है पर तब तक चिडिया मर चुकी थी इसीलिए कहा गया है की सच्चे प्यार का कभी भी इम्तहान नहीं लेना चाहिए, क्यूंकि सच्चा प्यार कभी इम्तहान का मोहताज नहीं होता है......."

क्यूं कहते हो मेरे साथ कुछ भी बेहतर नही होता

"क्यूं कहते हो मेरे साथ कुछ भी बेहतर नही होता सच ये है के जैसा चाहो वैसा नही होता कोई सह लेता है कोई कह लेता है क्यूँकी ग़म कभी ज़िंदगी से बढ़ कर नही होता आज अपनो ने ही सीखा दिया हमे यहाँ ठोकर देने वाला हैर पत्थर नही होता क्यूं ज़िंदगी की मुश्क़िलो से हारे बैठे हो इसके बिना कोई मंज़िल, कोई सफ़र नही होता कोई तेरे साथ नही है तो भी ग़म ना कर ख़ुद से बढ़ कर कोई दुनिया में हमसफ़र नही होता...................."

प्रेम म्हणजे ..........

प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं ! काय म्हणता ? या ओळी चिल्लर वटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा तरीसुद्धा, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं ! मराठीतून इश्श म्हणुन प्रेम करत येतं; उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत; व्याकरणात चूकलात तरी प्रेम करता येतं; कोन्वेंटमधे शिकलात ती प्रेम करता येतं ! सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लगतात ! आठवतं ना ? तुमची आमची सोळा जेव्हा, सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती ! लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बूडता बूडता वाचलो होतो ! बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं : प्रेमानेच अलगद वर काढलं असतं ! तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं ! कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं ! प्रेमबीम झूट असतं म्हणणारी मणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात ! असाच एक जण ............

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला, आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ... माझ्या मांडीत डोक ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला, तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ... तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला आयुष्यात प्रेम करायचय मला ... आयुष्यातील तिचा हिमालय तिच्या बरोबरीने चढायचाय मला शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ... ति माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला .. तिच्यसोबतचे माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी तिचा चेहेरा पहात जायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ...

१५ ऑगस्ट

प्रथम स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्षगाठीसाठी शुभेच्छा.......... आज १५ ऑगस्ट ना ग… आनंदाने भरून आलाय ऊर पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर… सांग भारतात स्टेट्स आहेत किती ? असतील पंचवीस तीस आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..! सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ? कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही पण ए. आर. रेहमानने काय गायलंय ! पण सोड ना हे प्रश्न यांची आता काय गरज ! “कौन बनेगा करोडपती” संपून झालेत बरेच दिवस ! मग आश्वासनं आणि स्वप्नं विका उद्याच पडणार ठाऊक आहे त्यांचा रंग फ़िका..! मग म्हण “विविधतेत एकता” वर्षभर मग हवी तेवढी चिखलफ़ेक करू शकता..! “मेरा भारत महान” जगाला ओरडून सांग . उद्या लावायचीय व्हिसासाठी अमेरिकन वकिलातीसमोर रांग. चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया . आणि चटावरच्या श्राद्धासारखे सत्कार समारंभ उरकूया .

एखाद्या दिवशी जर..................

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं तर मला हाक मार मी वचन तर देत नाही की..... मी तुला हासवेन पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल मला बोलव आणि..... मी वचन देतो की….. मी शांत राहीन पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर..... माझ्याकडे त्वरीत ये.... कदाचीत मलाच तुझी गरज असेल

जेवढं मला समझुन घेता येइल.......

जेवढं मला समझुन घेता येइल तेवढं मला समझुन घे, मी आहे थोडासा वेगळा खरचं मला उमगुन घे. मला वारा आवडत नाही त्यातला तुझा गंध आवडतो, श्रूंखला तोडुन सगळ्या तुझ्या हातांचा बंध आवडतो. पाऊस मला आवडत नाही तु झेललेला प्रत्येक थेंब आवडतो, माझ्या मनात निर्माण होणारा तुझ्या ओढीचा "कोंब"आवडतो. डोळ्यांना तुझी सवय झाली आहे तु नसल्यावर मी बावरतो, माझ्या मनात तु घातलेला पसारा मी कसाबसा सावरतो. खरचं मी वेगळा आहे मला समझुन घे थोडं, मला माझ्या आयुष्याचं सोडवुन दे कोडं.....

ओठांवर आलेले शब्द

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.... तिला कळतच नाही तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो... स्तब्ध होवू तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते... क्षुब्ध होऊन चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही ती नाही म्हणेल याची भीती वाटते ती नाही म्हणेल याची भीती वाटते पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं कुणास ठाऊक? तिच्याही एखाद्या पुस्तकात माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.............