जेवढं मला समझुन घेता येइल.......

जेवढं मला समझुन घेता येइल
तेवढं मला समझुन घे,
मी आहे थोडासा वेगळा
खरचं मला उमगुन घे.
मला वारा आवडत नाही
त्यातला तुझा गंध आवडतो,
श्रूंखला तोडुन सगळ्या
तुझ्या हातांचा बंध आवडतो.
पाऊस मला आवडत नाही
तु झेललेला प्रत्येक थेंब आवडतो,
माझ्या मनात निर्माण होणारा
तुझ्या ओढीचा "कोंब"आवडतो.
डोळ्यांना तुझी सवय झाली आहे
तु नसल्यावर मी बावरतो,
माझ्या मनात तु घातलेला पसारा
मी कसाबसा सावरतो.
खरचं मी वेगळा आहे
मला समझुन घे थोडं,
मला माझ्या आयुष्याचं
सोडवुन दे कोडं.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमेल का आपली जोड़ी ..................?

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!