पोस्ट्स

जुलै, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कणा

ओळखलत का सर मला - पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन ; गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर , आता लढलो आहे पडकी भिंत बांधतो आहे . चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ’ पॆसे नको सर , जरा एकटेपणा वाटला ’ मोडून पडला संसार तरी मोडला नाही ’ कणा ’, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ....         कुसुमाग्रज.......

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या , तीस केवीं त्याजी जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी ; असूं दूर पेशावरीं , उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं , मराठी असे आमुची मायबोली , अहो ज्ञानदेवीच देखा खरी मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं पुरी बाणली बंधुता अंतरंगी , हिच्या एक ताटांत आम्ही बसूं हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा , नका फक्त पाहू हिच्या लक्तरां प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ’ मराठी असे आमुची मायबोली ’, वृथा ही बढाई सुकार्याविणें मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ...

असं असतं प्रेम

एका डॉक्टरांकडे एक ८० - ८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले . सकाळी ८ . ३० चा सुमार . ते डॉक्टरांना म्हणाले , थोडं लवकर होईल का काम ? मला ९ वाजता एकीकडे जायचंय . डॉक्टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं . त्यांनी जखम तपासली , सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली . दरम्यान , ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते . "" आजोबा , ९ वाजता दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे का ?'' "" नाही ! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय .'' "" हॉस्पिटलमध्ये ? आजारी आहेत का त्या ?'' "" हो ! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती .'' "" अच्छा ! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत , तर वाट पाहतील ना त्या ? काळजीही करतील ...?'' "" नाही डॉक्टर . तिला " अल्झायमर्स ' झालाय . ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही .'' आजोबा शांतपणे म्हणाले . डॉक्टर चकित होऊन म्हणाले , "" आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता ...

राष्ट्रपित्याचा अंतिम क्षण

इमेज

होतं का हो तुमचं कधी असं?

होतं का हो तुमचं कधी असं? होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं? वाटतं नशीब करतंय आपलंच हसं.. नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस, सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेट विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते 'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता.. रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता 'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता.. 'सालं नशीबच कंडम' म्हणून पुन्हा पुन्हा रडता साध्या साध्या कामात शंकाकुशंकाना ओढता पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी' देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं जणू कालचं सारे घडल्यासारखं तीच आयुष्याची मजा घेत मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं अजुनही मला आठवतंय.... Lecture ला दांडी मारुन बाजुचा परिसर फिरत बसायचो फिरुन कंटाळा आला की परत college कडे वळायचो Canteen वाल्याला शिव्या घालत बाहेरच्या café मध्ये जायचो Café बंद असला की परत Canteen मधलंच येऊन गिळायचो Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Canteen समोरच असल्याने Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत आमच्या group ला मात्र मुलींची तशी allergy होती कदाचीत college कडून ती आमच्या group ला झाली होती चालु तासाला मागच्या बाकावर Assignment copy करायचो ज्याची copy केली आहे त्याच्या आधीच जाउन submit करायचो खुप आठवतात ते दिवस... सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की डोळ्यात टचकन् पाणि येतं...........

एकदा

एकदा तिच्या संगे मी पावसात भिजलो होतो बेलगाम आवेगाच्या वादळात घुसलो होतो वादळात घुसल्यावरती वाढले पुराचे पाणी कळले न कधी लाटांनी मी पूरा वेढलो होतो वेढताच मज लाटानी अदृश्य किनारे ज़ाले बुड्ल्यावर लोक म्हणाले मी खोल उतरलो होतो उतरलो खोल होतोच जगण्याचा ठाव बघाया फ़ेकुन मुखवटे सारे नागवा जाहलो होतो नागवेपणाचे ओज़े पेलवले नाही जेव्हा लाजेच्या निकडीसाठी वस्त्रात अडकलो होतो वस्त्रात अडकल्यावरती लपवित गेलो सारे वाटेल जगाला तेव्हा मी सुन्दर सजलो होतो सजल्यावर स्वागत होते कळताच सभ्यता शिकलो पोषाखी अस्तित्वाच्या गर्दित हरवलो होतो हरवलो असा कि पाउस नकोसा होतो तो धुवाधार येताना खिडकीशी थिजलो होतो