कणा


ओळखलत का सर मला - पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी
षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन;
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढलो आहे
पडकी भिंत बांधतो आहे. चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पॆसे नको सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....


        कुसुमाग्रज.......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे