पोस्ट्स

आज पुन्हा ठरवले,..

आज पुन्हा ठरवले,.. तुला नाही आठवायचे,.. इतरांना नाही जमले तरी,.. स्वताला तरी फ़सवायचे,.. कशाला उगीचच आयुष्य आस नासवायचे,.. तू नाही तर काय जाले आणखी कोणाला तरी पटवायचे,.. पण जेव्हा जेव्हा आस ठरवायचे,.. तेव्हा तेव्हा मन जास्तच तुज्या कड़े धावायाचे

माणूस म्हणून जगताना

माणूस म्हणून जगताना  हा एक हिशोब करुन तर बघा! किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?   हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!  कधी असेही जगून बघा.....   कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी   समोरच्याचा विचार करुन तर बघा!   तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी   न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!   कधी असेही जगून बघा.....   संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात   कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!   स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण   कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!   कधी असेही जगून बघा.....   वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते   कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!   काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?   आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!   कधी असेही जगून बघा.....   प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?   एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!   ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते   त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!   कधी असेही जगून बघा.....     अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय ...

ती म्हणाली मला.....

ती म्हणाली तू मला इतका कसा ओळखतोस, कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस. आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते, तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'याद' येते. नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून, तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन? हे असं होण शक्य तरी कसं आहे, नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे. अगं वेडे... मी म्हणालो, अगं वेडे मी म्हणालो, क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो. अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते, तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते. येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो, तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो. तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो, तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो. तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो, मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो...

अस्वस्त पिढीची डायरी

काय  चाललय......  माहित नाही.  का चाललय.... माहित नाही.  टी.वी. ते वर्त्तमानपत्र रकानेच्या रकाने भरून गेलेले अस्वस्ततेने ध्वजवंदन करताना ताठ मानने वर बघतो तीच मान खली घालावी लागतेय लटपतालेल्या जेंद्यासाठी! छातीवर गोळ्या घेतलेल्यासाठी अभिमानाने भरून यावी  अशी छाती आता ददप्ली गेल्याची जाणीव करतेय अस्वस्थ ..... वीरमरण आलेल्यांसाठी मान वर करून सलाम करावा आसा आपण काना मोडून पडलाय, का?     हा प्रश्न करतोय अस्वस्थ ....... मनातले कलोखालेले ढग आकाशात आलेत  कोंदत वतावारानात आजुन कालोख करायला   केवळ १० जनाना संपवायला होते १००० जन तो पर्यन्त त्यांनी २५० संपविले होते  हे व्यस्त गणित करते अस्वस्त........ आता सार शांता जालय आम्हीही शांतपणे खिडक्या दार गच्च बंद करून बसलोय  प्रकाश येण्यासाठी खिड़की उघडायची का? नकोच, अचानक अंधारच आला तर...? ह्या भितिपोती  का अतिरेक्यांचे पुतले बनवुयात, जालुयात आणि मारुयात लाथा बुक्क्यानी  राग शांता करण्याच सर्वात सोप तंत्र. आणि पुष्पचक्र , हार , श्रधांजलि , होर्डिग्स , एसेमेस आहेतच...... देशभक्ति दर्शावंयासाठी  तसच टी.वी समोर तर रात्रंदिवस आहोतच उरलीसुरली संवेदना मारण्य...

लव्हलेटर

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणी बेटर असतं गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं ज्यातला कंटेंट राईट आणी ग्रामर नेहमीच राँग असतं सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं आणी जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खीशात पेन नसतं पटलं तर पप्पी आणी खटकलं तर खेटर असतं! लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबीट असतं वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबीट असतं शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!! लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं फिफ्टी सर्टन आणी फिफ्टीचं जजमेंट असतं ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेंड नसतं हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!! लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं तीसर्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं दोघांपुरतच बांधलेलं सत्तर एम ए...

दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा

चकली खाईन कडाम कुडुम......!! तडम तुडुम तडम तुडुम चकली खाईन कडाम कुडुम......!! दोनच दात.......पण खायची घाई नीट घास रे......अशी ओरडते आई......!! बेसन लाडू किती छान रव्याचा लाडू गोरा गोरा पान.......!!  करंजी शेव ची जमली गट्टी  विसरा गृहपाठ.......शालेला पडली सुट्टी.....!! चिवडा शंकरपाली मस्त मजा अनारसा म्हणजे दिवालीचा राजा.......!! भुईचक्र अनार फुलबाजा.......मजा येईल छान उटण्याची आंघोळ करून ज़रा होइन गोरा पान........!! बाबांनी आणला आकाश कंदील हात उनचाउन तो दादा दारावर बांधेल.......!! भाऊबिज ला ताई देईल.......गोड़ गोड़ मुका  म्हणेल चला नमस्कार करा........पायावर डोक टेका.......!! छान छान आहे माझी दीवाली....... द्या मला एक चकली.......खाताना जर माझी आठवण आली........!! हाक मारा फ़क्त मला मी धावत येईन........ दोनच दात असले तरी काय झाल....कडाम कुडुम...कडाम कुडुम....चकली खाईन.......!! कडाम कुडुम...कडाम कुडुम....चकली खाईन.......!!  _./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.¸.•¤**¤•., . *•. .•* दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा /.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•..,.•¤**¤•.,

मी...मी कोण आहे

मी...मी कोण आहे आणि कसा आहे आणि का आहे??हे प्रश्न मोठ-मोठ्या लोकांना निरुत्त्तर करतात..ह्या प्रश्नाना मी काय उत्तर देणार??आफ़ाट पसरलेल्या या भूसागरात,ब्रह्मांडात मी एक शुल्लक ठिपका आहे..एक उर्जाकण,ह्याहून जास्त काही नाही.मी ईथे का आहे..का जगतोय??हे सगळ आधिच ठरलेल आहे..ते जाणण्याची माझ्या बुद्धिची पोच नाही..कधी तरी ते माला कळेल..शेवटी तेच तर शोधण्यासाठी माझा जन्म झाला आहे..मी एकटाच जन्माला आलो.... अणि एकटच पंच महाभुतात विलीन होणार...... ही सगळी नाती, परिवार, सगळ डोळ्यासमोर पसरवण्यात आलेले एक चित्र आहे...... वास्तव नाही.... तुम्ही जगता, सकाळी उठता, श्वास घेता, आजारी पडता हा तुमचा भास आहे..... डोक्यातल्या ज्या अवयवाला आपण मेंदू म्हणतो..... त्यची किमया अपरंपार आहे, त्यात एव्हढी शक्ति दडलेली आहे त्याची कोणालाच कल्पना नाही..... physics मध्ये जे universal constants आहेत ते सत्यात शाश्वत नाही. एक अद्न्यात उर्जा त्यांना बद्धित ठेवते.हीच ती...... mind power...... ती कोणालही नेस्तनाभूत करु शकते नाही तर जीवन दान देवू शकते...... आपण सामान्य लोक ईश्वर म्हणतो..... तो तुमच्यातच लपलेला आहे..... त्याला ...