पोस्ट्स

तुमचं दु:ख खरं आहे....

तुमचं दु : ख खरं आहे .... कळतं मला , शपथ सांगतो , तुमच्याइतकंच छळतं मला ; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं , आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं . सूर तर आहेतच ; आपण फक्त झुलायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत ? डोळे उघडून पहा तरी ; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत ! हिरव्या रानात , पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं ! मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं , दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं ! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . आपण असतो आपली धून , गात रहा ; आपण असतो आपला पाऊस , न्हात रहा . झुळझुळणार् या झर् याला मनापासून ताल द्या ; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या ! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . ‍‍

तुझी आठवण आता येत नाही मला

तुझी आठवण आता येत नाही मला तुलाही मी आता आठवत नसेन तरीही पाऊस पडला की बाहेर बघ मी तुझीच वाट पाहत असेन पावसात तुला दिसणार नाहीत अश्रू अलगद जेव्हा मी तुझ्याजवळ बसेन आठवतील मग मला तुझे शब्द राग येऊन मग मी तुझ्यावर रुसेन आनंदात मग मी तू भेटल्यावर माझे डोळे हलकेच पुसेन तु विसरु शकणार नाहीस कलंडता सुर्य , लवंडती सांज पक्षांच्या माळा , किणकिणती सांज तु विसरु शकणार नाहीस सोनेरी उन , वा-याची धुन पावलांची चाहूल , ओळखीची खुण तु विसरु शकणार नाहीस दिलेला शब्द , ओझरता स्पर्श दडलेले प्रेम , ओसंडता हर्ष तु विसरु शकणार नाहीस भिजलेले डोळे , विरलेली स्वप्नं भिजलेली वाट , उरलेले प्रश्न तु विसरु शकणार नाहीस आणि मी ही विसरु शकणार नाही संध्याकाळ जवळ आली की............ संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं माणसांमध्ये असुनसुध्दा मी अगदी एकता असतो

तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही भरून आलेल्या आभाळात ढगही वाट पाही तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही होत होता त्या दिवशी ढगांचा गडगडाट थांबत नव्हता त्या दिवशी विजांचा कडकडाट मोरही त्या दिवशी फुलवू लागले पिसारा सुर्यानेही आवरून घेतला किरणांचा पसारा ढगांकडेही त्या वेळी दुसरा पर्यायच नव्हता काही तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही एके दिवशी माझ्या डोळ्यातच आभाळ आल मनामध्ये दाटलेल्या भावनांच वादळ झाल त्या दिवशी मी कशातच रमत नव्हतो सगळ्यांमध्ये असून सुध्दा कुणाशीच बोलत नव्हतो डोळे झाले ओले , पापणीही अश्रूंनी जड होत जाई तरीही ..... त्या दिवशी ' तो ' बरसलाच नाही चान्दण स्वच्छ सफेद , पोर्णिमेची रात्र सजलेली मिलना साठी आतुर ' ती ' त्याच्या साठी नखशिकांत नटलेली प्रेमाचे सारेच भाव तिच्या हृदयातून उमलत होते त्याचे ही डोळे तिला असेच काहीतरी सांगत होते तिलाही होतीच अश्या एका तृप्त रात्रीची घाई तरीही ..... त्या दिवशी ' तो ...

दूर निघून जाण्यापूर्वी

दूर निघून जाण्यापूर्वी एवढं तरी कर अंगणात माझ्या घेऊन ये एखादी तरी सर ... तुझ्या सरीनं पुन्हा एकदा भरून जाऊदे अंगण तुझ्या पुरानं पुन्हा एकदा वाहुन जाऊदे कुंपण पसरून माझे हात पुन्हा झेलीन तुझ्या गारा श्वासामध्ये भरून घेईन सळाळणारा वारा ओसरून जाता सर तुझी दूर निघून जाशील ओल्याचिंब तुझ्या आठवणी मागे ठेऊन जाशील जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी दुरावलेली सर आठवणींचा पाऊस येईल भिजवून जाईल घर ....

ती जाताना 'येते' म्हणून गेली....

ती जाताना ' येते ' म्हणून गेली अन जगण्याचे कारण बनून गेली! म्हटली मजला ' मनात काही नाही ' पण जाताना मागे बघून गेली! तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली वार नखाचा हलके करून गेली... घडे क्षणांचे रिते असे केले की देहसुखाचा प्याला भरून गेली कळते हा बगिचा का फुलला माझा काल म्हणे ती दारावरून गेली! तसे पाहता पाउस तितका नव्हता कळे न का ती इतकी भिजून गेली... तिच्या भोवती गंध अता दरवळतो ( सहवासचे अत्तर टिपून गेली!)

मी तिच्यात....... नव्हतो पण ती माझ्यात होती.......

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती तीची नव्हती कधी पण माझी साथ होती मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा माझी ती बिचारी लहान पायवाट होती तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती. नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती. तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती. मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळालप्रेम

सर तुम्हीच सांगितले होते ना,

सर तुम्हीच सांगितले होते ना, जा आणि तिच्या कडून notes घे….. शिकवले नाही तर काय झाले? notes वाचून परीक्षा दे….. म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो कणा मोडला पण प्रेमात पडलो…. तिला फक्त ‘देतेस का?’ विचारले…. माहीत नाही , तिच्यावर का आभाळ कोसळले?…. notes एवजी तिने frdship असा अर्थ घेतला…. (नी पुढे बोलायाच्या आतच ) एक धक्का जोरात दिला….. पडलो एकदाचा खड्ड्यात, आणि मोडला माझा कणा…. पण काहीही असो सर, परत एकदा लढ म्हणा…. मी तर म्हणतो सर, तुम्ही कधी शिकउच नका… notes ‘परत आण’ म्हणायला, जराही कचकू नका….