तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

भरून आलेल्या आभाळात ढगही वाट पाही
तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

होत होता त्या दिवशी ढगांचा गडगडाट
थांबत नव्हता त्या दिवशी विजांचा कडकडाट
मोरही त्या दिवशी फुलवू लागले पिसारा
सुर्यानेही आवरून घेतला किरणांचा पसारा
ढगांकडेही त्या वेळी दुसरा पर्यायच नव्हता काही
तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

एके दिवशी माझ्या डोळ्यातच आभाळ आल
मनामध्ये दाटलेल्या भावनांच वादळ झाल
त्या दिवशी मी कशातच रमत नव्हतो
सगळ्यांमध्ये असून सुध्दा कुणाशीच बोलत नव्हतो
डोळे झाले ओले , पापणीही अश्रूंनी जड होत जाई
तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

चान्दण स्वच्छ सफेद, पोर्णिमेची रात्र सजलेली
मिलना साठी आतुर 'ती ' त्याच्या साठी नखशिकांत नटलेली
प्रेमाचे सारेच भाव तिच्या हृदयातून उमलत होते
त्याचे ही डोळे तिला असेच काहीतरी सांगत होते
तिलाही होतीच अश्या एका तृप्त रात्रीची घाई
तरीही ..... त्या दिवशी 'तो ' बरसलाच नाही

पाउस ,अश्रू , प्रियकर यांचा नेमच नाही काही
कधी बरसतिल काही सांगताच येत नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे