मी तिच्यात....... नव्हतो पण ती माझ्यात होती.......

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती

तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळालप्रेम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे