पोस्ट्स

मे, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काहितरी वेगळ करायचय........

काहितरी वेगळ करायचय........  ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय  पाणवठा जरी गढुळ असला तरी  पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.   काहितरी वेगळ करायचय........  आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय  पानांच्या जाळीवर बसुन उडायचय  मिटलेल्या श्वासांना  आता अस्तित्वातात आणायचय.  काहितरी वेगळ करायचय........  स्वप्नांच्या देशात भटकायचय  प्रयोगानिशी शोधायचय  भवनेच्या पंखात बळ घेऊन  पुन्हा मायदेशी परतायचय.   काहितरी वेगळ करायचय........  चिखलातल्या कमळाला फुलवायचय  सुकलेल्या फुलांना जगवायचय  माती रुक्ष असलि तरी  मातीतल्या माणसांसाठी जगायचय. काहितरी वेगळ करायचय........

पाकचे पार्लमेंट हाऊस कधी उडवायचे????

पाकचे पार्लमेंट हाऊस कधी उडवायचे???? कि भडव्यांनी फक्त मारायचे, आणि आम्ही मरायचे??? रोज साला कुठे ना कुठे, एक बॉम्बस्फोट होतो. रस्त्यावरती चालता चालता, कोणाच्यातरी घरचा "वर" जातो. तेच तेच आक्रोश ऐंकण, आता खुप असह्य होतय. हिरव्या रक्ताचे फितुर होण, आता खुप डोक्यात जातय. इथलेच खातात भडवे,साले..., "मुस्लिम मुजाहिदिन" बनतात. "अल्ला अल्ला" करतात आणि आम्हाला काफिर म्हणतात. मला नाही मरणाची भीती.., मी मरायला सुद्धा तयार आहे. वेळ आलीच तर पाकिस्तान मध्ये, बॉम्बस्फोट करायला सुद्धा तयार आहे. पण, षंडानो तुमचे काय?, तुम्ही काय करणार...? शेजाऱ्यावर प्रेम करणार? की देशासाठी मरणार? मानवतेची भाषा फक्त, मनुष्य जातीला कळते. ज्यांच्या रक्तात श्वापद आहेत, त्याना "त्यांचीच" भाषा कळते. नैतिकतेची भाषा बोलणाऱ्यानो, कधी घरातला कोणी मेला की कळेल. तेव्हा कुठे असतील तुमचे बोबडे बोल? कोण मग त्याच्या "मडयावर" रडेल? फुकट घरात बसुन फक्त, भारतमाता की जय करू नका. मतदान करतो म्हणून स्वत:ला, देशवासी तुम्ही म्हणू नका.

प्रेम

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही मागुन कधी मिळत नाही वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षाच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तर्‍हा असतात साऱ्या सारख्याच जीवघेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात प्रेमाच्या सफल-विफलतेला खरंतर काही महत्त्व नसतं इथल्या जय-पराजयात एकच गहिरं सार्थक असतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं खुल्या सोनेरी ऊन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं

प्रेम करायचे होते………!!!

प्रेम करायचे होते………!!! प्रेम करायचे होते तुझ्या निरागस त्या रुपावर मला पाहून मुरडलेल्या अन् नकट्या नाकावर……..! प्रेम करायचे होते तुझ्या नखरेल त्या रूसण्यावर निपक्षपाती नदी परी खळाळत्या हसण्या वर……! प्रेम करायचे होते त्या श्रावणी हीरवळी वर हळूच गाली खुलणारया तुझ्या मन मोहक खळी वर …….! प्रेम करायचे नवख्या दिन रात झुरण्या वर गुंतुन स्वप्नी तुझ्याच वेड्या परी फिरण्यावर…..! प्रेम करायचे होते निरपेक्ष नकारावर तरी मनात लपवलेल्या तुझ्या मूक होकरावर…….! हळूवार तुझे भाव सखी माझ्या साठी नसण्यावर तरी प्रेम कारयाचे होते तुझे 'माझे'च असण्या वर……..!!!

प्रेयसी

कधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल, सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेन…, तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती, ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा ‘ती’ माझी नव्हती…, ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता, नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता…, अशातच जेव्हा मी पहिलंदा तिला पाहिले, विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले…, तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे, काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे.., मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत, बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत…, काय कराव तेच कळत नव्हते, कसही करून तिचे मन जिंकायचे होते…, हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले, विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले…, महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला, होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला…, समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे, तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे…, शेवटी करायला नको ते धाडस मी केले, होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले…, मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?, ‘तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे…, एकून तिचे उत्तर, ‘मन’ बेभान होउन नाचले, अतिआनंदाने ड...

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...   काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,  आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,   गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,  जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,   जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,  बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,   मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,  माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,   स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,  तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,   खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडलो आहे हे समजण्या साठि...  एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,   प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,  खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

कोकणात येवा

कोकणात येवा आंबोलीक जावा, धबधब्यात न्हावा! मालवणचो बांगडो खावा, खाजा घेवा, दर्यात थोडे पेवा!! चारय बाजुक दर्यो आणी किल्ल्यात पाणी गोड! उगाच नाय सगळ्याका सिंधुदुर्ग किल्ल्याबद्द्ल ओढ!! वाडीचो डोंगर चढा, मोती तलाव फिरा, खेळणी घेवा लाकडी! आरवलीचो वेतोबा, रेडीचो गणपती बघुक वाट करा वाकडी!! आंबे, फणस, जांभळा, काजु, कोकणचो मेवो! शिपये, मुले, तिसरे खरो रत्नागिरीचोच ठेवो!! डोंगरमळे शेती, पोफळी, माडार नारळाचो भार! गाडयेत्सुन बघीत येवा सगळा हिरव्या हिरव्या गार!! नापरे, आंबोली धबधब्यासाठी पावसात तुंम्ही येवा! तेरेखोल खाडी बघताना फेरीबोटीचोय अनुभव घेवा!! डोंगरदरे, शेतीमळे, पार करुन कोकण रेल्वे सुरु झाली! मुंबयपासुन गोव्या पर्यंत माणसा एकदम जवळ ईली!! निसर्ग सौंदर्य म्हणतत ता तुंम्हीच डोल्यांनी बघा! बघुन वगी र्‍हवा नको इतर लोकांका तुंम्ही सांगा!! हकडे तकडे खयच जवक नको, कोकणच आमचा बरा! कोकण बगुन पाय उचलाचो नाय, जावक तुमच्या घरा! ज़ावक तुमच्या घरा!!

त्याला आपण गाठायचे असते.

क्षितीज दुरुन फार छान दिसते, म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते. तर त्याला आपण गाठायचे असते.. सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात, तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते. म्हणुन त्याला आपण गाठायचे असते.. जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते, पण आपण मुळीच कंटाळायचे नसते. तर त्याला आपण गाठायचे असते.. खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात, पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते. कारण त्याला आपण गाठायचे असते.. एक दिवस कळते आपण बरेच अंतर कापलेले असते, आणी तरीही क्षितीज तिथुनही तितकेच दुर असते. पण मागील लोकांना आपण क्षितीजावरच असल्याचे भासते.. तिथेही आपण थांबायचे नसते, पुढे पुढेच जायचे असते, क्षितीज अजुनही दुर असते, त्याला आपण गाठायचे असते.. त्याला आपण गाठायचे असते..

तुझं ते निरागस बोलणं

तुझं ते निरागस बोलणं मला खुप आवडतं , चारचौघातही तुझ वेगळेपण अगदी आपसुखच जाणवतं!!! डोळ्यात तुझ्या दिसुन येतो माझ्यावरचा अतोनात विश्वास, खळखळून तुझ हसणं खरंच वाटतं झकास!!! तुझा तो मिश्कीलपणा आणि ते खोड्या करणं, जरा जरी रागावलो मी तरी चट्कन डोळ्यातनं पाणी काढणं!!! माझा प्रत्येक शब्द तु किती सहजपणे जपतेस, सांग बरं ही कला कुठ्ल्या शाळेत शिकतेस? तुलाही फुलाप्रमाणे जपण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतोय, अभिमान वाटतोय मला माझा की मी तुझ्यावर प्रेम करतोय ....

एकदा ………..मला

एकदा ………..मला परमेश्वर भेटला मी त्याला सहजंच विचारलं तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ? ...........माणसाचे मन आणि सगळ्यात वाईट गोष्ट ? ...........माणसाचे मन, बाप्पा मला पुढे म्हणाला….. ऐक, मी एक कुबेर बनवला होता… त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची. मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची………. लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो……….. मनं जप, मनं जोड, माणसं मिळव……. विचार कर……….” तेंव्हापासून हे वेड लागलंय……….. आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय, खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी, की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय…..

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले.....

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले...... 'ए आपण असे कसे रे   ना रंग, ना रूप,   नेहमीच चिडीचुप,   आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,  दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,   कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,   किनारा ही नाही साधा या पापण्याला............   दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,   खुप विचार करून तो बोलला,   रंग-रूप नसला तरी,   चिडीचुप असलो जरी,   आधार आपण भावनांचा,   आदर राखतो वचनांचा,   सान्त्वनांचे बोल आपण,   अंतरीही खोल आपण,   सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,   दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,   आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,   बंधनात नाही कोणी बंधवु शकत,    उद्रेक आपण मनातील वेदनांचा,   नाजुक धागा वचनातील बंधनांचा,   भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,   स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,   म्हणुनच,   आपले बाहेर पड़णे भाग आहे,   आपल्यामुलेच आज हे जग आहे.   अशीच आपली कहाणी.........    ऐकून ही अश्रुची वाणी   अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

students's Garva

Syllybus जरा जास्तच आहे दर वर्षी वाटतो... Chapters पाहून Passing चा Problem मानत दाटतो... तरी lectures चालू राहतात डोक्यात काही घुसत नहीं.... चित्र-विचित्र figures शिवाय Board वर काहीच दिसत नाही.... तितक्यात कुठून तरी Exam ची Date जवळ येते... Sem मधले काही दिवस नकळत चोरून नेते... नंतर lecturers Extra घेउन भरभरा शिकवत राहतात... Problems Example Theory सांगून Syllybus लवकर संपवू पाहतात... पुन्हा हात चालू लागतात... मन चालत नाही.... सरांशिवाय वर्गामध्ये कुणीच बोलत नाही... Lectures संपून Submission चा सुरु होतो पुन्हा खेळ.. File Complete करण्यामध्ये फार फार जातो वेळ... चक्क डोळ्यांसमोर Syllybus चुटकी सरशी sampun जातो.. 'Notes मध्ये वाचून सुद्धा Paper काबरे सो...सो..च जातो??????

फक्त तुझ्याचसाठी ...........

इमेज
फक्त तुझ्याचसाठी ...........   आयुष्यातले प्रत्येक क्षण   मोजत असता मला हळूच चाहूल लागून जाते   एक सावली पडून जाते   थंड वारा वाहवून जाते   तेव्हापासून  सारखा मी वाट  पाहतो   त्या सावलीची ती चाहूल   त्या थंड वाऱ्याच्या झोक्याची   नजरेसमोर येणारया त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची   तेव्हा पासून मन माझे   मला सांगत असते   वाट पाहायची तिच्यासाठी   वाट पाहयची त्या सावलीसाठी   कधीतरी ती व्यक्ति समोर येते   मनाला आनंदाचा अस्वाद देते   तिच्या फक्त गोड शब्दांमधून   अनेक गोडवे जाणवतात    तेव्हा माझे मन स्वत: ठरवते   सर्व काही मिळवीन फक्त तुझ्यासाठी  सर्वकाही सोसीन फक्त तुझ्यासाठी   आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन फक्त तुझ्यासाठी   आयुष्यातील सर्व दु:ख   गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन   डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन   अन ते डोळे मिटिन   मला असेच वाटते ....   आयुष्य जगावे हे तुझ्याचसाठी   सर्व काही संपवावे फक्त तुझ्याचसाठी   प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा फक्त तुझ्याच साठी   हे ह्र्दय काढून द्यावे फक्त तुझ्याच साठी