तुझं ते निरागस बोलणं

तुझं ते निरागस बोलणं
मला खुप आवडतं ,
चारचौघातही तुझ वेगळेपण
अगदी आपसुखच जाणवतं!!!
डोळ्यात तुझ्या दिसुन येतो
माझ्यावरचा अतोनात विश्वास,
खळखळून तुझ हसणं
खरंच वाटतं झकास!!!
तुझा तो मिश्कीलपणा
आणि ते खोड्या करणं,
जरा जरी रागावलो मी तरी
चट्कन डोळ्यातनं पाणी काढणं!!!
माझा प्रत्येक शब्द
तु किती सहजपणे जपतेस,
सांग बरं ही कला
कुठ्ल्या शाळेत शिकतेस?
तुलाही फुलाप्रमाणे जपण्याचा
मी आटोकाट प्रयत्न करतोय,
अभिमान वाटतोय मला माझा
की मी तुझ्यावर प्रेम करतोय ....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे