पोस्ट्स

मृत्यूसारखी सुंदर गोष्ट

वेडा म्हणाल मला पण मी वेडा मुळीच नाहि खरे सांगतो मित्रांणो मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही जिवन हे पुरतेच छळते याची जाणीव मात्र सरणावर जळताना होते भाई-बंधू सगे सगे-सोयरे असतात नुसते नावापुरते यमासारखा खरा मित्र जिवनात शोधूनहि सापडत नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही पाप-पुण्याची गणना येथे कर्म-कांडाच्या बळावर करतात केलेली पापे धुण्यासाठी मग श्री क्षेत्रे फ़िरतात पृथ्वीवर जेवढे पाप तेवढे प्रत्यक्ष नरकात सुद्धा नाहि आणी या नरकातुन सोडवणारा मृत्यूशिवाय दुसरा कुणीच नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही गरिब श्रीमंत, कोण मोठा कोण छोटा याच्या दरबा्री मात्र सर्वांना सारखीच जागा नश्वर या जगात अमर असा कुणीच नाहि साक्षात स्वर्ग सुद्धा पहायला मृत्यूशिवाय पर्याय नाहि म्हणुन म्हणतो मित्रांणो याला घाबरण्यासारख काहिच नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही

प्रेम करायचे होते………!!!

प्रेम करायचे होते तुझ्या निरागस त्या रुपावर मला पाहून मुरडलेल्या अन् नकट्या नाकावर……..! प्रेम करायचे होते तुझ्या नखरेल त्या रूसण्यावर निपक्षपाती नदी परी खळाळत्या हसण्या वर……! प्रेम करायचे होते त्या श्रावणी हीरवळी वर हळूच गाली खुलणारया तुझ्या मन मोहक खळी वर …….! प्रेम करायचे नवख्या दिन रात झुरण्या वर गुंतुन स्वप्नी तुझ्याच वेड्या परी फिरण्यावर…..! प्रेम करायचे होते निरपेक्ष नकारावर तरी मनात लपवलेल्या तुझ्या मूक होकरावर…….! हळूवार तुझे भाव सखी माझ्या साठी नसण्यावर तरी प्रेम कारयाचे होते तुझे 'माझे'च असण्या वर……..!!!

.....

समजावुनी व्यथेला समजावता न आले   मज दोन आसवाना हुल्कावता न आले   सर एक श्रावणाची आली........ निघून गेली....  माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले ?   सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;  माझ्याच उत्तराला मज शोधता न आले !   चुकवुनही कसा हा चुकला न शब्द माझा   देणे मलाच माझे नाकारता न आले !   लपवीत गीत माझे पळ काढला तरीही   ह्रुदयातल्या विजाना झिडकारता न आले !   केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,   जगने अखेर माझे मज टालता न आले

चारोळ्या............

मुलं हरवल्यावर बायका रड रड रडतात .. आणि ती भेटल्यावर त्यांना बडव बडव बडवतात..! घट्ट लावुन घेतलेली दारं बाहेर "वेल-कम"चं तोरण अहो, हे कसलं घर बंद करुन स्वागत करायचं धोरण..? मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता...! प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत... फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..! तुझ्यावर प्रेम करतो हे तुला सांगायचं राहिलं हे सांगायच्या आधीच तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं

अश्रु

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले...... 'ए आपण असे कसे रे ना रंग, ना रूप, नेहमीच चिडीचुप, आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर, दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर, कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला, किनारा ही नाही साधा या पापण्याला............ दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला, खुप विचार करून तो बोलला, रंग-रूप नसला तरी, चिडीचुप असलो जरी, आधार आपण भावनांचा, आदर राखतो वचनांचा, सान्त्वनांचे बोल आपण, अंतरीही खोल आपण, सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे, दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व, आपल्याला नाही कोणी थांबवु शकत, बंधनात नाही कोणी बंधवु शकत, उद्रेक आपण मनातील वेदनांचा, नाजुक धागा वचनातील बंधनांचा, भावबंध ह्र्दयातील रुदनांचा, स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा , म्हणुनच, आपले बाहेर पड़णे भाग आहे, आपल्यामुलेच आज हे जग आहे. अशीच आपली कहाणी......... ऐकून ही अश्रुची वाणी अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

तुझ्या प्रेमात

तुझ्या प्रेमातच हसायचे होते, तुझ्या प्रेमासाठीच रडायचे.... ..........तुझ्या प्रेमातच जगायचे होते, ..........तुझ्या प्रेमासाठीच मारायचे...... तू आलीस अन्,,,हसण्याला; माझ्या जगण्याला अर्थ आले.... तू गेलीस अन् ,,,माझे रडणे; तुझ्यासाठी मारणेही व्यर्थ झाले..... ..........आता स्वतःशीच बोलतो, गप्पा मारतो; ..........स्वतःलाच समजावतो, ओरडतो; ..........कधी हस्तो, कधी खूप खूप रडतो; ..........तुझ्या शोधात इकडे-तिकडे भटकतो....... हरवलेल्या तुझ्या प्रेमाला; खूप शोधायचे प्रयत्न करतो..... आकाशाकडे बघून,,, त्या दैवाशीही भांडतो...... ..........तरीही तुझ्या आठवणींना,,, ..........जीवापाड मी जपते....... ..........अन्,,, तू नसलेल्या, ..........तुझ्याच आयुष्यात जगत जातो..... तू नसलेल्या,,,, ..........तुझ्याच आयुष्यात मी जगत जातो...

तुझी वाट धुक्यात हरावालिये ...........

तुझी वाट धुक्यात हरावालिये ........... मला खुप बोलायच होत, अन तुज्यासंगे चार पावल चालायच होते, तुजबरोबर आयुष्याच स्वप्न रंगवायाच होत, अन त्या रंगात मनसोक्त बगादयाचा होत , आजही वाटत वेळ नाही गेली, कदाचित , तुझ्यासाठी अजुन योग्य वेळ नाही आली , पण माझाच मी अंत पाहू किती? अन तुझ्या न परतून येण्याच्या वाटेवर उभी राहू किती? माझ जगन हेच माझ्यासाठी एक कोड झाले, अन म्हनुनच तुझ नाव निघाल्यावर chidan हे फक्त निमित्त झालय, का विचार करते तुझा , हा विचार त्रास देतोय, तू भावनांशी खेलालास माझ्या, हे समजावून घेन अवघड जातय , कोनाच चुकल? आणि काय चुकल? हां विचारच सोडलाय, माझिया मानत मीच आज दुफलिचा डाव मांडलाय, जगासमोर मी खुशिच ढोंग करते, कस सांगु तुला एकांतात मी किती आक्रन्दते, तू काय विचार करत असशील ? तू मजसम तिलतिल टूटल असशील? हा प्रश्नच व्यर्थ, अन त्याच उत्तरही व्यर्थ, माहित आहे .....तुझी वाट धुक्यात हरावालिये, अन ........माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............ माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............ माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............