चारोळ्या............

मुलं हरवल्यावर बायका
रड रड रडतात .. आणि
ती भेटल्यावर त्यांना
बडव बडव बडवतात..!


घट्ट लावुन घेतलेली दारं
बाहेर "वेल-कम"चं तोरण
अहो, हे कसलं घर बंद करुन
स्वागत करायचं धोरण..?


मेकअपच्या ढगाआड
तिचा चेहरा लपला होता
सौंदर्याचा अट्टाहास तिने
पैशामुळे जपला होता...!


प्रेम कसे करावे याचे
देखिल क्लासेस आहेत...
फेल होणा-यांचा हातात
दारुन भरलेले ग्लास आहेत..!

तुझ्यावर प्रेम करतो हे
तुला सांगायचं राहिलं
हे सांगायच्या आधीच
तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे