.....

समजावुनी व्यथेला समजावता न आले  
मज दोन आसवाना हुल्कावता न आले  
सर एक श्रावणाची आली........ निघून गेली.... 
माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले ?  
सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा; 
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले !  
चुकवुनही कसा हा चुकला न शब्द माझा  
देणे मलाच माझे नाकारता न आले !  
लपवीत गीत माझे पळ काढला तरीही  
ह्रुदयातल्या विजाना झिडकारता न आले !  
केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,  
जगने अखेर माझे मज टालता न आले

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट