पाउस..!

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..!

मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला.
तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..!

कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला.
मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..!

अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली.
रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..!

कधी सरीतून निघता जखमांवरची खपली.
स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..!

तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे