कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला
?

जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला
?

कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास


काट्यांतच मग खुडावं लागतं.....

कुणाला कुणी असं सोडुन का जातं
?


होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं


बरसतानाच नकळत हरवुनही जातं

भर चांदरातीही मनास मग

एकट्यालाच झुरावं लागतं...

कुणाला कुणी असं सोडुन का जातं
?


कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये


झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये

वाळवंटी या जगात

एकट्यालाच मग जगावं लागतं...

कुणाला कुणी असं सोडुन का जातं
?


मी जगुन घेतो एकटा


माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा

तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...

कुणाला कुणी असं सोडुन का जातं???


By------Manasi....J-----

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट