जमेल का आपली जोड़ी ..................? कॉलेज चे गेट . झाली तिथे भेट . घुसलीस मनात थेट. देशील का मला डेट ....................? मी रोगी तू दवा. तू फुगा मी हवा . तू चुल मी तवा . सांग तुला मी हवा .....................? तू तपकीर मी चिमुट . तू साडी मी सूट. मी मोजा तू बूट. जमेल का आपल मेतकुट ........................? तू धाप मी छाती . मी शनि तू साडेसाती . मी भुत तू भानामती . जुलतिल का आपली नाती .......................? मी पेट्रोल तू गाड़ी . मी गवत तू काडी. मी विजार तू नाडी. जमेल का आपली जोड़ी ...........................?
टिप्पण्या