मैत्रीच्या पावसात........

मैत्रीच्या पावसात काल म्हटलं पावसाला,

माफ कर बाबा,

आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ

मला शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय

भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.

ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,

"काळजी नको.

भिजून घे खूप.

भिजणं थांबलं की

घे पुन्हा मैत्रीचीच ऊब

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमेल का आपली जोड़ी ..................?

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!