आम्ही ऑर्कुटवीर

धुंद आम्ही ऑर्कुटवीर आम्हाला काय कुणाची भीती?

स्क्रॅप, पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती!

आय-वे च्या कोपऱ्यात उपजली,
ऑर्कुटवीराची रीत... लॉगीन-पासवर्ड शी लगीन लागलं,
जडली वेडी प्रीत! लाख प्रोफाइलं ब्राऊझ करतो,
दिनभर आणि राती स्क्रॅप,
पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती!

ऑर्कुटवर एकाहूनी एक कम्युनिट्यांची नावं...
जॉईन करावं, करूनं सोडावं, हेचं आम्हाला ठावं!
ऑनलाईन हो भेटती अनेक, सगे आणि साथी,
स्क्रॅप, पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती!

धुंद आम्ही ऑर्कुटवीर आम्हाला काय कुणाची भीती?
धुंद आम्ही ऑर्कुटवीर आम्हाला काय कुणाची भीती?
स्क्रॅप, पोस्ट अन टेस्टिमोनियलसाठी, की-बोर्ड घेतला हाती!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट