अजुन काय हवे

एकच चहा, तो पण कटींग.....
एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि....
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते मित्राकडुन?

एकच कटाक्ष, तो पण हळुच....
एकच होकार, तो पण लाजुन...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून.....
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडुन....
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून....
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन....
एकच गरम पोळी, ती पण तूप लावुन....
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवं आणुन....
अजुन काय हवे असते आईकडुन?

एकच कठोर नकार स्वैराचाराला, तो पण ह्दयावर दगड ठेवून.....
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोग-या आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन....
अजुन कय हवे असते वडिलाकडुन?

सगळ्यानी खुप दिलं, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!