ती

मनापासून ती खूप आवडते मला.  
तिच्या मनातलं, पण माहीत नाही.  
मी दिलेल्या फुलांपैकी एकही फुल.  
तिच्या हृद्याच्या वहीत नाही..  

श्वासाहून जास्त तिचे विचार येतात.  
ती विचारांच्या भानगडीत पडत नाही.  
म्हणते "मी भावनांच्या कुशीत गवसते".  
पण विचारांच्या मिठीत सापडत नाही..  

डोळे तिचचं चित्र रेखाटतात.  
तिच्या डोळ्यांचं सांगू शकत नाही.  
दिसतो तिथे अधून मधून तसा.  
पण काजवा होऊन चमकत नाही..  

प्रत्येक स्वप्नात ती हजेरी लावते.  
तिच्या स्वप्नांचं सांगता येत नाही.  
समुद्राच्या वाळूत घर बांधायला.  
अजून तिचं मन तसदी घेत नाही..  

कदाचित तिच्या प्रेमात मी बुडतोय.  
ती बुडत असेल पटत नाही.  
दोघांच्या मनात एकसारखी क्रिया.  
घडत असेल असं वाटत नाही..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे