पोस्ट्स

डिसेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृत्यूसारखी सुंदर गोष्ट

वेडा म्हणाल मला पण मी वेडा मुळीच नाहि खरे सांगतो मित्रांणो मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही जिवन हे पुरतेच छळते याची जाणीव मात्र सरणावर जळताना होते भाई-बंधू सगे सगे-सोयरे असतात नुसते नावापुरते यमासारखा खरा मित्र जिवनात शोधूनहि सापडत नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही पाप-पुण्याची गणना येथे कर्म-कांडाच्या बळावर करतात केलेली पापे धुण्यासाठी मग श्री क्षेत्रे फ़िरतात पृथ्वीवर जेवढे पाप तेवढे प्रत्यक्ष नरकात सुद्धा नाहि आणी या नरकातुन सोडवणारा मृत्यूशिवाय दुसरा कुणीच नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही गरिब श्रीमंत, कोण मोठा कोण छोटा याच्या दरबा्री मात्र सर्वांना सारखीच जागा नश्वर या जगात अमर असा कुणीच नाहि साक्षात स्वर्ग सुद्धा पहायला मृत्यूशिवाय पर्याय नाहि म्हणुन म्हणतो मित्रांणो याला घाबरण्यासारख काहिच नाहि मृत्यूसारखी सुंदर गोष्ट या जागात दुसरी कुठलीच नाही

प्रेम करायचे होते………!!!

प्रेम करायचे होते तुझ्या निरागस त्या रुपावर मला पाहून मुरडलेल्या अन् नकट्या नाकावर……..! प्रेम करायचे होते तुझ्या नखरेल त्या रूसण्यावर निपक्षपाती नदी परी खळाळत्या हसण्या वर……! प्रेम करायचे होते त्या श्रावणी हीरवळी वर हळूच गाली खुलणारया तुझ्या मन मोहक खळी वर …….! प्रेम करायचे नवख्या दिन रात झुरण्या वर गुंतुन स्वप्नी तुझ्याच वेड्या परी फिरण्यावर…..! प्रेम करायचे होते निरपेक्ष नकारावर तरी मनात लपवलेल्या तुझ्या मूक होकरावर…….! हळूवार तुझे भाव सखी माझ्या साठी नसण्यावर तरी प्रेम कारयाचे होते तुझे 'माझे'च असण्या वर……..!!!

.....

समजावुनी व्यथेला समजावता न आले   मज दोन आसवाना हुल्कावता न आले   सर एक श्रावणाची आली........ निघून गेली....  माझ्या मुक्या तृशेला पण बोलता न आले ?   सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;  माझ्याच उत्तराला मज शोधता न आले !   चुकवुनही कसा हा चुकला न शब्द माझा   देणे मलाच माझे नाकारता न आले !   लपवीत गीत माझे पळ काढला तरीही   ह्रुदयातल्या विजाना झिडकारता न आले !   केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,   जगने अखेर माझे मज टालता न आले

चारोळ्या............

मुलं हरवल्यावर बायका रड रड रडतात .. आणि ती भेटल्यावर त्यांना बडव बडव बडवतात..! घट्ट लावुन घेतलेली दारं बाहेर "वेल-कम"चं तोरण अहो, हे कसलं घर बंद करुन स्वागत करायचं धोरण..? मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता...! प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत... फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..! तुझ्यावर प्रेम करतो हे तुला सांगायचं राहिलं हे सांगायच्या आधीच तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं

अश्रु

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले...... 'ए आपण असे कसे रे ना रंग, ना रूप, नेहमीच चिडीचुप, आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर, दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर, कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला, किनारा ही नाही साधा या पापण्याला............ दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला, खुप विचार करून तो बोलला, रंग-रूप नसला तरी, चिडीचुप असलो जरी, आधार आपण भावनांचा, आदर राखतो वचनांचा, सान्त्वनांचे बोल आपण, अंतरीही खोल आपण, सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे, दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व, आपल्याला नाही कोणी थांबवु शकत, बंधनात नाही कोणी बंधवु शकत, उद्रेक आपण मनातील वेदनांचा, नाजुक धागा वचनातील बंधनांचा, भावबंध ह्र्दयातील रुदनांचा, स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा , म्हणुनच, आपले बाहेर पड़णे भाग आहे, आपल्यामुलेच आज हे जग आहे. अशीच आपली कहाणी......... ऐकून ही अश्रुची वाणी अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

तुझ्या प्रेमात

तुझ्या प्रेमातच हसायचे होते, तुझ्या प्रेमासाठीच रडायचे.... ..........तुझ्या प्रेमातच जगायचे होते, ..........तुझ्या प्रेमासाठीच मारायचे...... तू आलीस अन्,,,हसण्याला; माझ्या जगण्याला अर्थ आले.... तू गेलीस अन् ,,,माझे रडणे; तुझ्यासाठी मारणेही व्यर्थ झाले..... ..........आता स्वतःशीच बोलतो, गप्पा मारतो; ..........स्वतःलाच समजावतो, ओरडतो; ..........कधी हस्तो, कधी खूप खूप रडतो; ..........तुझ्या शोधात इकडे-तिकडे भटकतो....... हरवलेल्या तुझ्या प्रेमाला; खूप शोधायचे प्रयत्न करतो..... आकाशाकडे बघून,,, त्या दैवाशीही भांडतो...... ..........तरीही तुझ्या आठवणींना,,, ..........जीवापाड मी जपते....... ..........अन्,,, तू नसलेल्या, ..........तुझ्याच आयुष्यात जगत जातो..... तू नसलेल्या,,,, ..........तुझ्याच आयुष्यात मी जगत जातो...

तुझी वाट धुक्यात हरावालिये ...........

तुझी वाट धुक्यात हरावालिये ........... मला खुप बोलायच होत, अन तुज्यासंगे चार पावल चालायच होते, तुजबरोबर आयुष्याच स्वप्न रंगवायाच होत, अन त्या रंगात मनसोक्त बगादयाचा होत , आजही वाटत वेळ नाही गेली, कदाचित , तुझ्यासाठी अजुन योग्य वेळ नाही आली , पण माझाच मी अंत पाहू किती? अन तुझ्या न परतून येण्याच्या वाटेवर उभी राहू किती? माझ जगन हेच माझ्यासाठी एक कोड झाले, अन म्हनुनच तुझ नाव निघाल्यावर chidan हे फक्त निमित्त झालय, का विचार करते तुझा , हा विचार त्रास देतोय, तू भावनांशी खेलालास माझ्या, हे समजावून घेन अवघड जातय , कोनाच चुकल? आणि काय चुकल? हां विचारच सोडलाय, माझिया मानत मीच आज दुफलिचा डाव मांडलाय, जगासमोर मी खुशिच ढोंग करते, कस सांगु तुला एकांतात मी किती आक्रन्दते, तू काय विचार करत असशील ? तू मजसम तिलतिल टूटल असशील? हा प्रश्नच व्यर्थ, अन त्याच उत्तरही व्यर्थ, माहित आहे .....तुझी वाट धुक्यात हरावालिये, अन ........माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............ माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............ माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............

. सुख म्हणे:

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर. होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर. झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर. आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे. जेवढं रडायचं आहे आज रडून घे ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे आणखी काही हवं असेल तर मागुन घे आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे आज शेवटच मला डोळे भरुन पाहून घे

आपल्या जवळ जे नाही

आपल्या जवळ जे नाही त्याचीच मानवी मनाला ओढ असते सर्वच मनं सारखी घडत नसतात म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते ......... फुले शिकवतात......, गुलाब सांगतो, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं; रात रानी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखात ही फुलायचं असतं; सदाफुली सांगते, रुसुन रुसुन रहायचं नसतं, हसुन हसुन हसायचं असतं; बकुळी म्हणते, सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं; मोगरा म्हणतो, स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो; कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवुन फुलायचं असतं

चारोळ्या

का होतं मन असं हळवं का होतं मन असं हळवं कोणाच्या तरी आठवणीने ? एक एक क्षण का वाटे युगासमान, त्याच्या दूर जाण्याने ? भेटीनंतरही का ..... भेटण्याची आस असते ? त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये का रात्र सारी हरवते ? त्याने फक्त आपल्यालाच पहावं, आपल्याशीच बोलावं.. असं काही वाटू लागतं प्रत्येक छोटी गोष्ट ही त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं कळलं का तुम्हाला, अचानक असं वेड्यासारखं का होतं ? दुसरं काही नाही ......... यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं "

अधुरे प्रेम

आपणच तोडायला हवेत आता सारे बंध दूर सारायला हवा हळव्या स्मृतींचा गंध अलगद सोडवून टाकू प्रेमाचे हे रेशीमधागे वळून पहायलाही काही ठेवायचं नाही मागे आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे रंग आपणच पुसायचे पापण्यांत अश्रू दडवून जगासमोर हसायचे आपणच विणलेल्या स्वप्नांना आपणच देऊ मूठ्माती या जन्मीचं राहिलेलं प्रेम राखून ठेवू पुढच्या जन्मासाठी

मनातल्या मनात

सर्वांनी सांगितलं तुझं मन तिच्यापुढे व्यक्त कर डोळ्यांनी नव्हे तर शब्दांनी सारं स्पष्ट कर ||१|| सल्ला आवडला माझ्या मनाला उचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायला नंबर तिचा फिरवला मनाचा समतोअल बिघडला खरंच का तु सांगु शकशील तिच्या मनांत नसलं तर उगाच चांगली मैत्रीण गमावशील मनाची ही बाजु मनालाच पटली एक बेल तिच्या फोनची वाजली नकाराची घंटा माझ्या मनाची खणखणली दुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली ||२|| असंच का तु जगशील सांगितल्याशिवाय मानातलं तिला कसं तु समजावशील? भावना तुझ्या सा-या मनातल्या सांगणं तुला नकार या पैकी एकच उत्तर तुझे आहे ||३|| मनाचं द्वंद्व माझ्या आत चालू झालं सकारात्मक - नकारात्मक भांडण सुरु झालं लढाई फारच लांब रंगली दोन्ही पक्षांच्या विचारांची हानी मात्र झाली सरतेशेवटी सकारात्मकतेची बाजु जिंकली उचलुन फोन करावा हीच बाजु मनाला पटली ||४|| उशीर करणे योग्य नव्हते फोन करणे जरुरी होते सवयीप्रमाणे बोटे बटणांवर फिरली लगेचच बेल होनची खणखणली हॅलो म्हणुन समोरुन कुणीतरी बोलमं आवाज ओळखीचा, म्हणुन हाय म्हटलं कुशल मंगल सारं विचारलं विषय कसा काढु हेच नाही...

आयुष्य

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया जमतय का ते बघुया वाटल अगदी सोप असेल रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे एक दोनच की सगळेच वापरायचे मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने धागा होता फार उबदार आणि मुलायम म्हटल छान आहे हा धागा धाग्याने ह्या विण राहील कायम मग घेतला मैत्रीचा धागा म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला हळू हळू विण घट्ट होत होती तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा धागा होता सुंदर आणि रेशमी धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते थोड़े धागे पडले होते निवांत बसून असेच म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे आ...

तर..????

वाटणारी प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडता आली तर... मनातली प्रत्येक भावना बोलुन दाखवता आली तर... तुझ्यावर प्रेम आहे, हे सहज सांगता आलं तर.. तुझ्याशिवाय जगुच शकत नाही, हे पटवुन देता आलं तर... तुझी खुप आठवण येते हे विसरुन जाता अलं तर.... तुझ्या पलिकडे सुध्दा आहे हे जाणुन घेता आलं तर... माझं सुध्दा अस्तित्व आहे, हे समजुन घेता आलं तर... तु फक्त माझीच आहेस, हे तुला न सांगता कळलं तर.. तु अशिच जवळ रहा, हे स्पर्शानं सांगता आलं तर... तु जवळ नसतेस तेंव्हा, तुझा स्पर्श जाणता आला तर.. किती बरं होईल, जर मन वाचता अलं तर... शब्दांपलिकडलं काही तरीनजरेनच जाणता आलं तर... हे सगळेच "तर" नाहीसे होतील एकदाच म्हणालीस जर... "मी सुखी होईन, जर तु माझाच झालास तर..!

आरसा..

अनेक नजरांत.अनेक मनांत.. मी वेगवेगळा किती..! अरे देवा! ह्या धरतीवर.. मी रूपांत नेमका किती..! कुणाकुणाला कसेकसे.. माझे हे रुप ते भासे.. स्वतःस मजला माझी... अस्पष्ट आकृती दिसे.. समोरील मायाजालात या.. मी स्वतःस ओळखू कसा..? तो मीच खरा आहे का..? जो हा दाखवतोय आरसा........!!!

असंही प्रेम असतं!!

असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं.... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती? मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले... तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला.... मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?' तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!' मी विचारले ' आत्महत्येचं कारण?' तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!' मी चकीत झालो! विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?' तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...  बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...  मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे  मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...  पुसत जावेत ढगांचे आकार  आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ  त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,  भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग  आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे  आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...   बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले  अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले  घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....   विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात  विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,  वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट  ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी  सरोवर मात्र अजूनही तिथेच...  पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली  आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित  पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे......
जाते म्हणतेस हरकत नाही,  कढत अश्रु पाहुन जा, नाते तोडतेस हरकत नाही,  विझता श्वास पाहुन जा, जाणुन सारे संपवताना,  हिच एवढी विनंती, हसते आहेस हरकत नाही,  बुडती नाव पाहुन जा..

अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत नेहमी असंच घडणार आहे? तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट 'ते' न बोलताच संपणार आहे? भेट-वेळ रोजची ठरलेलीच तरी अजून काय ठरणार आहे? बोलायचं पटकन पण वेडं मन त्याचाही मुहुर्त पाहणार आहे ! भेटतो तेव्हाच माहित असतं निघायची वेळ येणार आहे पटकन विचारावा प्रश्न हवासा तर शब्द ओठीच अडणार आहे ! मी न विचारताच तू काय हवं ते उत्तर देणार आहे? हे पुरतं कळतंय तरीही तोंड माझं का बोलणार आहे? न बोलता बोललेले शब्द तुला वेड्याला कळणार आहे? मी बोलले/न बोलले तरी गप्पच नेहमीसारखा तू राहणार आहे ! भावभावना समजून घेणं सगळंसगळं थांबणार आहे उष्ट्या कुल्फीची चव मात्र जिभेवरती रेंगाळणार आहे स्वप्न माझं हे संपलं तरीही मनात तूच उरणार आहे तुझ्यात मी नसले तरी माझ्यात तूच सापडणार आहे ! पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं ... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं ! आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार् या धारा श्वासांमध्ये भरून घ्यायचा सळाळणारा वारा कानांमधे साठवुन घ्यायचे गडगडणारे मेघ डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची सौदामिनीची रेघ पावसाबरोबर पाऊस बनून नाच नाच नाचायचं अंगणामधे , मोगर् यापाशी तळं होऊन स...

एक कळी.......

अशाच एका सकाळी  सहज भेटली एक कळी.......   कळी खूप नाजूक होती.......  तरी फुलावे वाटे तिला सर्वांसाठी.......   कधी वारा तिज त्रास देई.......  लटपटे शरीर पण तशीच उभी राही.......   पाऊस खुपच कधी वेगाने बरसू पाही.......  अस्तित्व टिकवायची धडपड सारे जग पाही.......   तशीच फुलू पाही ती जोमाने.......  जरी झाला व्याकुळ ह्या उंन्हाने.......   देव नेहमीच तिची परीक्षा घेई.......  का असे ?तिने कधी प्रश्न केला नाही.......   नेहमीच ती आघात सोसू पाही.......  तरी खोटे हास्य नेहमी ओठतून वाही.......   प्रवास ना माहीत तिज तिच्या आयुष्याचा.......  तरी एक संघर्ष सगळी नाती टिकवण्याचा.......   सुकली जरी ती,तरी नवा जन्म घेईल.......  असंख्य वादळे पुन्हा झेलेल.......   अस्तित्व स्वताचे टिकवून ठेवेल......  एक दिवस तीचाच येईल.......