आरसा..
अनेक नजरांत.अनेक मनांत..
मी वेगवेगळा किती..!
अरे देवा! ह्या धरतीवर..
मी रूपांत नेमका किती..!
कुणाकुणाला कसेकसे..
माझे हे रुप ते भासे..
स्वतःस मजला माझी...
अस्पष्ट आकृती दिसे..
समोरील मायाजालात या..
मी स्वतःस ओळखू कसा..?
तो मीच खरा आहे का..?
जो हा दाखवतोय आरसा........!!!
टिप्पण्या