अस्वस्त पिढीची डायरी
काय चाललय...... माहित नाही. का चाललय.... माहित नाही. टी.वी. ते वर्त्तमानपत्र रकानेच्या रकाने भरून गेलेले अस्वस्ततेने ध्वजवंदन करताना ताठ मानने वर बघतो तीच मान खली घालावी लागतेय लटपतालेल्या जेंद्यासाठी! छातीवर गोळ्या घेतलेल्यासाठी अभिमानाने भरून यावी अशी छाती आता ददप्ली गेल्याची जाणीव करतेय अस्वस्थ ..... वीरमरण आलेल्यांसाठी मान वर करून सलाम करावा आसा आपण काना मोडून पडलाय, का? हा प्रश्न करतोय अस्वस्थ ....... मनातले कलोखालेले ढग आकाशात आलेत कोंदत वतावारानात आजुन कालोख करायला केवळ १० जनाना संपवायला होते १००० जन तो पर्यन्त त्यांनी २५० संपविले होते हे व्यस्त गणित करते अस्वस्त........ आता सार शांता जालय आम्हीही शांतपणे खिडक्या दार गच्च बंद करून बसलोय प्रकाश येण्यासाठी खिड़की उघडायची का? नकोच, अचानक अंधारच आला तर...? ह्या भितिपोती का अतिरेक्यांचे पुतले बनवुयात, जालुयात आणि मारुयात लाथा बुक्क्यानी राग शांता करण्याच सर्वात सोप तंत्र. आणि पुष्पचक्र , हार , श्रधांजलि , होर्डिग्स , एसेमेस आहेतच...... देशभक्ति दर्शावंयासाठी तसच टी.वी समोर तर रात्रंदिवस आहोतच उरलीसुरली संवेदना मारण्य...