पोस्ट्स

जून, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाट पाहण्याचा खेळ!!!!

पाने उलटतांना रोज एक पिंपळपान छळते ग तुझी माज़ी भेट अशी पान पान जपते ग.... भेटशील अशीच तू पुन्हा अन रंगेल जुना खेळ ग सागरची लाट एक तव किनारा हळूच भिजवेल ग... हुंदाका दाटेल कंठी अन शब्द ओठीच अडख़ळेल ग पुन्हा तेच पिंपळपान पाना पानात हसेल ग वाट पाहण्याचा हा खेळ सारा खेळ जरा जपून ग.........

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन.. ...टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून. दुरुनच बघायचय तिला चाकां आडून विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून चालायचय सोबत मग सायकल हातात धरून.. ...विचारणारे तिला आता योग्य संधी बघून. शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून.. ...कुणाचा रे विचार करतोयस तू अजून? नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून मी मात्र तिच्या नजरेला चुकवून.. ...काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून? तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून हातातली छत्री झटकन उघडून माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून.. ...पहायचय रे मला एकदा प्रेम करून !

पाहिले जेव्हा मी तुला.................

पाहिले जेव्हा मी तुला मन माझे गेले हरवूनी धडधडून तेव्हा सांगे ते मला प्रीती जडली लपुनी छपुनी ओठ ही सांगती मला मन माझे गेले गुंतूनी हकीकत माझी कशी तुला सांगू आहे कोण मी ते कुठवर लपवू का लपवूनी ठेविसी तुझे गुपित प्रयत्न करूनी झाले सर्व मला माहित जागो जागी आणुनी शब्द जिव्हेवर सांगतील सर्वां अपुल्या प्रीतिचे गुणगान

पहिला पाऊस पडतो तेंव्हा.............

पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार्‍या धारा श्वासांमध्ये भरून घ्यायचा सळाळणारा वारा कानांमधे साठवुन घ्यायचे गडगडणारे मेघ डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची सौदामिनीची रेघ पावसाबरोबर पाऊस बनून नाच नाच नाचायचं अंगणामधे, मोगर्‍यापाशी तळं होऊन साचायचं! आपलं असलं वागणं बघुन लोक आपल्याला हसतील आपला स्क्रू ढिला झाला असं सुध्दा म्हणतील ज्यांना हसायचं त्यांना हसू दे काय म्हणायचं ते म्हणू दे त्यांच्या दुःखाच्या पावसामधे त्यांचं त्यांना कण्हू दे असल्या चिल्लर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायचं! पहिला पाऊस एकदाच येतो हे आपण लक्षात ठेवायचं! म्हणून... पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं

मी मराठी.............

मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे." "मी मराठी मी मराठी" म्हटलं तर का पडली इतरांच्या कपाळावर आठी?..... दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर मराठी भाषेतली पाटी..... बसायलाच हवी होती अशी या दादा लोकांवर मराठीपणाची काठी... दूर केलीच पाहीजे ही त्या लोकांची दमदाटी.... आता फुटली आहे मराठीपणाच्या सहनशीलतेची पाटी... ही राज नीती खरंच नाही बरं का मराठी मतांसाठी .. हा तर खरा आवाज आहे मराठी अस्तित्वासाठी... बोलतंय कुणीतरी आता मराठी माणसासाठी... राज तर पुकारतोय लढा मराठीच्या रक्षणासाठी... पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे मराठी माणसाची गोची... रोजच्या रोज माणसे येवून येवून मुंबई भार सहन करेल तरी किती? मुंबईच काय, ते तर शिरलेत आता मुळा मुठा नदीच्याही काठी... द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या गुदमरलेल्या जीवासाठी ... जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!!!!!!

मैत्री ठरवून होत नाही..........

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.... मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.... तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा...

तुझ्या नीखळ सौंदर्याकडे बघून.......

तुझ्या नीखळ सौंदर्याकडे बघून सुंदरताही लाजलीय, तुझे हास्य एकूण खुद्द हास्यही हीरमुसलय, त्या खळखळनार्या नीरझराने तुझीच प्रेरणा घेतलीय, वेणूंच्या सप्त सुरांनीही तुलाच साद घातलीय, तुला बघीतल्यापासून माझे शब्दच हरवलेत, पण माझ्या हृदयाचे गीत माझे ओठ गुणगूणत आहेत. तुझ्या प्रेमाने माझ्यावर एक वेगळीच जादू केलीय, देवाकडे काय मागू तुला तो स्वतः माझ्याकडे तुला मागायला आलाय...

Click to enlarge टपोरी लव स्टोरी

इमेज

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको

प्रेमत पडण सोप असतं पण..............

प्रेमत पडण सोप असतं पण प्रेम निभवणं कठीण असतं..... हातात हात घेउन चलणं सोप असतं पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन पाउलवाट शोधणं कठीण असतं, कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोप असतं पण ती गुतंवनूक अयुष्यभर जपणं कठीणं असतं माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोप असतं पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल करणं मात्र कठीणं असतं प्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं सोप असतं पण ती वचनं अणि शपथा निभवनं मात्र फ़ारच कठीणं असतं प्रेमात खोटं बोलणं सोप असतं पण खर बोलून प्रेम टिकावन मात्र नक्कीच कठीणं असतं म्हणून सांगतो की प्रेमात पडणं सोप नसतं,सोप नसतं,सोप नसतं

पान जरी कोरं असलं....तरी

पान जरी कोरं असलं, तरी पानालाही भावना असतात. मन जरी वेडं असलं, तरी मनालाही भावना असतात. पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत, मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत. मनं हे असचं असतं, इकडून तिकडे बागडत असतं. मनाला काही बंधनं असतात, म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात म्हणून मानत चालणार्या भावनेचा खेल आपल्याला कळत नाही एकदा मी प्रेमाला विचारले कुठे कुठे तू असतोस रे? प्रेम मला हसून म्हणाला.. अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे... जेव्हा तुला कोणी आवडतो.. मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे... तू विचार फक्त माझाच करतो कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........ अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे... प्रेम तू कुणावरही कर.... मी तुला तिथेच दिसणार असतो रे.... तू प्रेम दुसर्याला जितके देशील... त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे... अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे... आयुष्य खरच खूप सुंदर आहे.. माझा हात सोडून देऊ नकोस रे...... जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार.. मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहें आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

परि तुज सम आहेस तूच

लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच वहा रे! ते नजर फेकणे वहा रे! ते नखरेल चालणे कसा सावरू सांग माझे भूलणे हा केशभार की काळे घन समजू हे नयन तुझे की लख्ख बिजली समजू कुणा कुणाला देशिल असली सजा लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच तुही सुंदर ऋतु ही सुंदर असे माझे मन माझ्या काबूत नसे शांत परिसर करितो माझी दुर्दशा पिण्या वाचून चढली मला नशा लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच अबोल झालीस तू जर सजणे टाळिन माझे मीच मरणे आहेस जरी तू परी वा सुंदरी कशास ठेविसी अशी मगरूरी दाखविशील का किंचीत जरूरी लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तुच श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Your Name

इमेज

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये.............

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर ह्र्दय कधी जोडतांना असह्य यातना व्हावी डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये की पानांना ते नाव जड व्हावे एक दिवस अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे तुटलेच जर स्वप्न अचानक हातात आपल्या कहीच नसावे कुणाला इतकाही वेळ देवू नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा एक दिवस आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका व्हावा कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी त्याची वाट बघता बघता आपलीच वाट दिशाहीन व्हावी कुणाची इतकेही ऐकू नये की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा आपल्या ओठातूनही मग त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा कुणाची अशीही सोबत असू नये की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी कुणाला इतकाही माझा म्हणू नये की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे त्या संभ्रमातून त्याने आपल्याला ठेच देवून जागे करावे पण,पण कुणाच्या इतक्याही दूर जावू नये की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसाव......

स्वप्न मात्र तुजीच........

इमेज

तुज़े माजे ..........

इमेज

येणार्या प्रतेक सावलीत ..........

इमेज

आज पुन्हा ठरवले ...........

इमेज

सुंदर

इमेज

तुज़े भास आणि माजे श्वास

इमेज

आई सारखे दैवत ..............

इमेज

माणसाने समुद्र होण्यापेक्शा................

माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा.. लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा.. किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा... त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी.. पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने... म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...

Chemistry लैब की लव स्टोरी

ना Chmistry होती ना मैं Student होता ना ये Lab होती ना ये Accident होता अभी Practical मैं आयी नज़र एक लड़की सुन्दर थी नाक उसकी Test Tube जैसी बातों मैं उसकी Glucose की मिठास थी Sanson मैं Ester की खुशबू भी साथ थी आँखों से झलकता था कुछ इस तरह का प्यार बिन पिये ही हो जाता है Alcohol का खुमार Benzene सा होता था उसकी Presence का एहसास अँधेरे मैं होता था Radium का आभास नजरें मिलीं , reaction हुआ कुछ इस तरह Love का Production हुआ लगने लगे उस के घर के चक्कर ऐसे Nucleus के charon तरफ Electron होने जैसे उस दिन हमारे Test का Confirmation हुआ जब उस के daddy से हमारा Introduction हुआ सुन कर हमारी बात वो ऐसे उचल परे Ignesium Tube मैं जैसे Sodium भरके उठे वो बोले , होश मैं आओ , पहचानो अपनी औकात Iron मिल नहीं सकता कभी Gold के साथ ये सुन केर टुटा हमारे अरमानो भरा बाकर और हम चुप रहे Benzaldehyde का करवा घूँट पी कर अब उस की यादों के सिवा हमारा काम चलता ना था और Lab मैं हमारे दिल के सिवा कुछ जलता ना था ज़िन्दगी हो गयी Unsaturated Hydrocarbon की तरह और हम फिरते हैं आवारा Hydroge...

जीवनाच्या रथाचे आहेत सुख दु:ख सारथी

दु:खाच्या घरी एकदा जमली होती पार्टी दारु बीरु पिऊन अगदी झिंगली होती कार्टी... दु:ख म्हणाले " दोस्तानों " बिलकुल लाजु नका इतके दिवस झळले म्हणून राग मानु नका !!! मनात खुप साठले आहे काहीच सुचत नाही माझी "स्टोरी" संगीतल्या शिवाय आता राहवत नाही.... मी आणी सुख दोघे जुळे भाऊ होतो पाच वर्षाचे होतो तेव्हा जत्रेत गेलो होतो... गर्दि आशी जमली नी गोंधळ असा उठला... माणसांच्या त्या गर्दि मध्ये सुखाचा हात सुटला! तेव्हा पासुन फिरतोय शोधात दुनियेच्या जत्रेत दिसतोय का सुख माझा कुणाच्याही नजरेत... :सुखा बरोबरचे लहाणपणीचे क्षण त्याला स्मरले आणि सुखाच्या आठवणीने दु:ख ढसा ढसा रडले! नशा सगळ्यांची उतरली दु:खाकडे पाहुन! दु:खालही सुख मिळावे वाटले राहुन राहुन... सुखाच्या शोधात आता मी सुध्दा फिरतोय दु:खाला शांत करण्याचा खुप प्रयत्न करतोय... जीवनाच्या रथाचे आहेत सुख दु:ख सारथी सुख मिळाले तर दु:खाच्या घरी मीच देईन पार्टी...

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी.... तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी लटकेच रागवत तिने आपल्या लक्शात आणून द्यावी आणि आपन आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी.... आपले सगळे सिक्रेट जाननारी जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्शाही खास असावी आई-बाबांशी ऒळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी

छान सुन्दर आणी साधी ..............................

छान सुन्दर आणी साधी ... मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि आपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित आणावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जागवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी माझी मैत्रि अशी असावी

कधी तरी आठवण काढ

कधी तरी आठवण काढ आठवण माझी कधीतरी येईलच तुला आठवण माझी कधीतरी येईलच तुला तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु सगळी आसवं तुझी त्यात सामावतील जो थांबला तुझ्या हातावर नीट बघ त्याच्याकडे एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता नीट वापर त्याला अडखळलेला तो शब्द मीच असेल कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल Hi friends once again i don't know the poet but it's in my कोल्लेक्शन कधी जर सुटला बेधुंद गार वारा मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुलुक नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

मराठी.....................

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामानात दंग ते मराठी आमुच्या रगरगात रंगते मराठी आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी आमुच्या नसानसात नाच ते मराठी आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुली त खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुला कुला त नांदते मराठी येथ ल्या फुला फुला त हासते मराठी येथ ल्या दिशा दिशात दाट ते मराठी येथ ल्या न गा न गात गर्ज ते मराठी येथ ल्या दरी दरीत हिंडते मराठी येथ ल्या वना वनात गुंजते मराठी येथ ल्या तरु लता त साजते मराठी येथ ल्या कलिकळीत लाजते मराठी येथ ल्या नभामधून वर्ष ते मराठी येथ ल्या पिकांमधून डोल ते मराठी येथ ल्या नद्यांमधून वाहते मराठी येथ ल्या चराचरात राहते मराठी पाहुणे जरी असंख्य पोस ते मराठी आपु ल्या घरात हाल सो स ते मराठी हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

असा एक किनारा असावा...............

असा एक किनारा असावा माणसा मणसात जिथे वाद नसावा नसावी तिथे कसलीच भिती वावरुदे तिथे सदा प्रिती असा हि एक किनारा असावा जीथे वारा उनाड असावा पाना झाडातुन वारा शिळ घालत सुटावा श्वासात ही माणसाच्या बेधभाव नसाव काहि किनारे असे हि असतात जे फक्त स्वप्नात दिसतात ज्यान्च्या वर्णनासाठी शब्द कमी पडतात असे किनारे स्वप्नातच का बरे दिसतात ??

प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा

प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो ह्रुदयातुन एक स्पन्दन आले, चेहरया वरचे भाव बदलले.. ह्रुदयातील त्या स्पन्दनाला, प्रेम हे नाव मिळाले.... जसं अतूट नातं असतं जसं अतूट नातं असतं पाऊस आणि छत्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! अंगरख्याच्या आत असतं मुलायम अस्तर जरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं हळुवार बंधन असतं श्रावणाशी सरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं नातं लाटांचं किना-याशी खात्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं........

पु. ल. देशपांडे यांच्या काही कविता

मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त. इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे. आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे. बोलणे हा इथला धर्म आहे आणि ऐकणे हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात आणि श्रोते उपकार करतात उपचारांना मात्र जागा नाही. *************************************** अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा? एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी? मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा! तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा ******************************** पंचवीस मार्क कमी पडून नापास झालेले चिरंजीव तीर्थरुपांना म्हणाले, 'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे. *************************** माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी परवा मला म्हणाली, 'मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना- इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय' ***************************** बहात्तर कादंबऱ्या लिहिणारी माझी थोर साहित्यिक आत्या दम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली तेव्हा '...

"कुणीतरी आठवणं काढतय"

हसता हसता डोळे लगद भरुनही येतील बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता "एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका घरचे म्हणीतील सारखा कसा लागतो उठता बसता चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे सांगुण द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही "कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

ती रात्र ...........

ती रात्र कधी, मजला भेटलीच नाही, खुडलेलीच कळी, ती फुललीच नाही, ती येईल म्हणुन, मी जागत राहीलो, ती येउन गेली, कुणा कळलीच नाही अनामिक मी इथे, सार्‍यांकडुन फसलो, मज दुवा कधी, वाट वदलीच नाही मी खुळा प्रवासी, धुंद चालत राहीलो, मज खुण थांब्याची, मुळी दिसलीच नाही त्या आठवणींचीच, होळी करीत राहीलो, सारा गाव जळाला, चीता पेटलीच नाही माझ्यावर माझ्या, खूनाचे आळ पाहीले, शिक्षा ती फाशीची, मला मिळालीच नाही मी आताही इथे, सदा रात्रीतच भटकतो, पण, ती रात्र कधी, मजला भेटलीच नाही.. ती रात्र कधी, मजला भेटलीच नाही, खुडलेलीच कळी, ती फुललीच नाही, ती येईल म्हणुन, मी जागत राहीलो, ती येउन गेली, कुणा कळलीच नाही अनामिक मी इथे, सार्‍यांकडुन फसलो, मज दुवा कधी, वाट वदलीच नाही मी खुळा प्रवासी, धुंद चालत राहीलो, मज खुण थांब्याची, मुळी दिसलीच नाही त्या आठवणींचीच, होळी करीत राहीलो, सारा गाव जळाला, चीता पेटलीच नाही माझ्यावर माझ्या, खूनाचे आळ पाहीले, शिक्षा ती फाशीची, मला मिळालीच नाही मी आताही इथे, सदा रात्रीतच भटकतो, पण, ती रात्र कधी, मजला भेटलीच नाही..

मला आवडलेल्या चारोळ्या .........

तुज्या ओठाजवळचा तिळ जिव घायाळ करुन जातो का अशी लाजुन हसतेस सखे माज्या ह्रुदयाचा एक ठोका चुकुन जातो.. ................................ सावळी ती तुझी काया आणि पसरलेला तो सुगंध, पहाटेच्य त्या गुलाबी प्रहरा मन होऊन गेले धुंद ................................ खुप त्रास होतो मला जिव कासावीस होऊन जातो ओळखीचा कुणी समोरुन जेव्हा ओळख न दाखवता निघुन जातो ................................ काही चुका मी केल्या मला त्या मान्य आहेत पण तुलाही मी उमगलो नाही यातही का चुक माझीच आहे? ................................ चांदन्या प्रकाशात सखे तुला मिठीत घ्यावे वाटते तुझ्या त्या स्पर्शाने सखे अंग अंग शहारावेसे वाटते ................................ एका नजरे मधेच जेव्हा तुला ज्याच्यावर विश्वास बसतो तोच तुझा खरा जोडीदार आणि तोच तुझा खरा सखा असतो ................................ माहित आहे कधी कधी आपलाच पाय घसरतो पण लक्षात ठेव तोल न सांभळनारे आपणच असतो

आज सगळीच उत्तरं हरवली होती..................

ज्या अनेक बेभान करणार्या गोष्टी आजुबाजुला होत्या त्या सगळ्याचा विसर पडावा इतकी ती सुंदर होती. नजर फिरुन फिरुन तिच्याकडे वळत होती, तिची मझी ओळख नव्हती, पण हातांच्या हालचालीनं होणार्या बांगड्याच्या आवाजांन... त्याच एका नादांची ओढ लागली होती. अवघं आसमंत तिनं व्यापुन टाकलं होतं माझ्यासकट सगळं विश्व तिच्यापुढं गहाण पडलं होतं. काळ्या सावळ्या ढगांकडे पहावं की, तिचं गुढ अनामिक व्यक्तिमत्व पहावं. हिरव्यागार शालु नेसलेल्या जमिनीकडे पहावं कि, तिच्या शितल वाटण्यार्या अस्तित्वानं बेभान व्हावं..... छे!............. आज सगळीच उत्तरं हरवली होती.

चार पावलं आपण........

चार पावलं आपण सोबत चालत जाऊ तुझे आणि माझे सूर कुठवर जुळतात पाहु... अर्थात जमत असेल तर चल मी आग्रह करणार नहीआज तरी, "तुला यावच लागेल, असा हट्ट ही धरणार नाही पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा व्यक्‍त करणं बरं असतं कारण इथून तिथून ऐकलेलं सारंच काही खरं नसतं कुणी कुणाला का आवडावं हे सांगता येत नाही चार चौघांना विचारून कुणी हृदय देत नाही तसंच काहीसं माझं झालं त्याच धुंदीत propose केलं जवळ अशी कधी नव्हतीसंच propose ने आणखीच दूर नेलं जे झालं ते वाईट झालं पण झालं ते बरंच झालं खरं सांगणं गुन्हा असतो एव्हढं मात्र लक्षात अलं जाऊ दे, झालं गेलं विसरून जा मागे न वळता चालत राहा मला विसर असं मी म्हणणार नाही पण तू तो प्रयत्न करून पाहा... थांब... इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस... सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस.....

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही..... कितीही सुंदर मुलगी दिसली तरी, तिची स्तुति करुन तिला हरभरयाच्या झाडावर चढवायला आम्हाला कधी जमलेच नाही ॥१॥ म्हणुन आम्हाला प्रेम... कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरणं आमच्या तत्वात कधी बसलेच नाही ॥२॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कोणी जर आवडलीच तर स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला आम्हाला कधी जमलेच नाही ॥३॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. दुसरयाचे विचार ऎकत असताना आपले विचार मांडण्याची संधी आम्हाला कधी साधताच आली नाही ॥४॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कधी हिंमत करुन कोणाला जर विचारालेच तर मी तुला त्या द्रुष्टीने कधी बघितलेच नाही या व्यतिरिक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही ॥५॥ म्हणुन आम्हाला प्रेम... प्रेमात नाही चा अर्थ हो असतो हे गणित आम्हाला कधी समजलेच नाही ॥६॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही बरयाच सुदर फुलां मधे वावरत होतो पण जाऊन बसण्यासारखे फुल अजुन आम्हाला दिसलेच नाही ॥७॥ म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही....

यात काही पाप नाही.........

यात काही पाप नाही......... यात काही पाप नाही......... सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका, आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही ! जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता, लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही ! देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता, गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही ! प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता, कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

आपल्याला पण एक मैत्रिण असावी!

आपल्याला पण एक मैत्रिण असावी! समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी घर जवळ येताच पुढे निघून जावी आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी दिसलो की गालवर छान खळी पडावी कधी हसता हसताच ती रडावी कधी रडता रडताच खुद्कन हसावी हक्काने आपल्यावर रागवावी मग कही न बोलताच निघून जावी नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी ती आनंदात असली की घडघडुन बोलावी नाहीतर थोडीशी अबॊल रहावी सुखात सगळ्यांना सामिल करावी व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी "साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसवीथोडा वेळ मग ती शांत रहावी पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी ती बरोबर असली की आधार वाटावी आपल्याला पण एक मैत्रिण असावी ..............

जमवून बघ"

जमवून बघ" जन्माला आला आहेसथोडं जगून बघ, जीवनात दुःख खूप आहे, थोडं सोसून बघ! चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचे पहाड चढून बघ! यशाची चव चाखून बघ, अपयश येतं, निरखून बघ, डाव मांडणं, सोपं असतं, थोडं खेळून बघ! घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ! जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना झेलून बघ! जीणं - मरणं एक कोडं असतं, जाता - जाता एवढं सोडवून बघ! प्रेम थोड़ कठीन आसत , सगलेच म्हणतात , वेळ मिळाला , तर थोड़ कुणावर तरी प्रेम करून बग.......................!

आयुष्यात एक तरी.......

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! एक मेकांना दिलेल्या दुःखांवरएक मेकांसोबत घालवलेल्या अनेकआनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी... आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! अनेक जुन्या आठवणींनी आणलेलेएक मेकांच्या डोळ्यातीलआनंदाश्रु पुसण्यासाठी..... आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! आयुष्यात पुढे येणारया अनेकदुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्याहातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी! आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच! प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणातएक मेकांचा हात धरण्यासाठी, एक मेकाला सावरण्यासाठी.....

मैत्री म्हंटली कीआठवतं ते

मैत्री म्हंटली कीआठवतं ते बालपणंआणि मैत्रीतून मिळालेलंते खरंखुरं शहाणपण कोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाही मैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यात श्रेष्ठंहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टं मैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सूतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सूप्त भूक मैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्रं मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातात मैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजूनचिंब चिंब नाहली मैत्रीचे बंधकधीच नसतात तुटणारेजुन्या आठवणींना उजाळा देऊनगालातल्या गालात हसणारे मैत्री पाहत नाहीकोण गरीब कोण श्रीमंतती पाहते फ़क्तमित्राचं अंतरंग मैत्री म्हणजेसमाधानाने भरलेली ओंजळवाळवंटात जसं कधीसापडतं मृगजळ मैत्रीच्या सहवासातअवघं आयुष्य सफ़ल होतंदेवाच्या चरणी पडून जसंफ़ुलांचही निर्माल्य होतं

आयुष्य.........

आयुष्य......... आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल, म्हणुन रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून ......... आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसल तरी एकट्यानेच ते फुलवत रहा

मी म्हंटले,माझे तुझ्यावर प्रेम आहे..

मी म्हंटले,माझे तुझ्यावर प्रेम आहे.. पण मी खोटे बोलले.. कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते.. प्रेमापेक्षाही जास्त आहे.. कसे असु शकते प्रेम... इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले, इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले, इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे, इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च, इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक, इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे, इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी, इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी.. कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते.. प्रेमापेक्षाही जास्त आहे..प्रेमापेक्षाही जास्त आहे..

मैत्री कशी असावी...

मैत्री कशी असावी... मैत्री असावी... साखरेसारखी शुभ्र, मधूर, गोडवा देणारी, जिवनात विरघळणारी आणि अशी की जिवनाहून वेगळी न वाटणारी, जिवन प्राशन केल्यावरही जिभेवर चव रेंगाळणारी, प्रत्येक क्षणाचा आस्वाद वाढवणारी, आनंदाच्या क्षणी तोंड गोड करणारी, जराही उष्णता लागली तरी लगेच करपणारी