प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा

प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

ह्रुदयातुन एक स्पन्दन आले,
चेहरया वरचे भाव बदलले..
ह्रुदयातील त्या स्पन्दनाला,
प्रेम हे नाव मिळाले....

जसं अतूट नातं असतं
जसं अतूट नातं असतं
पाऊस आणि छत्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

अंगरख्याच्या आत असतं
मुलायम अस्तर जरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं हळुवार बंधन असतं
श्रावणाशी सरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं नातं लाटांचं
किना-याशी खात्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं........

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे