मैत्री म्हंटली कीआठवतं ते

मैत्री म्हंटली कीआठवतं ते बालपणंआणि मैत्रीतून मिळालेलंते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यात श्रेष्ठंहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टं
मैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सूतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सूप्त भूक
मैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्रं मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजूनचिंब चिंब नाहली
मैत्रीचे बंधकधीच नसतात तुटणारेजुन्या आठवणींना उजाळा देऊनगालातल्या गालात हसणारे
मैत्री पाहत नाहीकोण गरीब कोण श्रीमंतती पाहते फ़क्तमित्राचं अंतरंग
मैत्री म्हणजेसमाधानाने भरलेली ओंजळवाळवंटात जसं कधीसापडतं मृगजळ
मैत्रीच्या सहवासातअवघं आयुष्य सफ़ल होतंदेवाच्या चरणी पडून जसंफ़ुलांचही निर्माल्य होतं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे