म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....
कितीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तिची स्तुति करुन तिला
हरभरयाच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कोणी जर आवडलीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
दुसरयाचे विचार ऎकत असताना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कधी हिंमत करुन कोणाला जर विचारालेच
तर मी तुला त्या द्रुष्टीने कधी बघितलेच नाही
या व्यतिरिक्त दुसरे काही
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
प्रेमात नाही चा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाला कधी समजलेच नाही ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वावरत होतो
पण जाऊन बसण्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे